S M L

'मालेगाव स्फोट प्रकरणी एटीएस अधिकार्‍यांवर कारवाई करा'

मालेगाव 24 मे : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी चुकीचा तपास करून निष्पाप तरुणांचं आयुष्य उद्धवस्त करणार्‍या एटीएसच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मालेगावमधल्या पीडितांनी केली आहे. 2006 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएनं नुकतंच नवं आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माजी कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आलंय. 2006 मध्ये शब-ए-बारातच्या दिवशी मालेगावमध्ये बडा कब्रस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एटीएसनं मालेगावमधल्या सातजणांना अटक केली होती. दरम्यान, स्फोटातले आरोपी साध्वी प्रज्ञासींग, कर्नल प्रसाद पुरोहित यांनीच 2006 चाही स्फोट घडवून आल्याचं पुढे आल्यानंतर तब्बल पाचवर्षांनंतर मालेगावमधल्या तरुणांची मुक्तता झाली. त्यामुळे एटीएसचा पहिला तपास चुकीच्या दिशेनं झाल्याचं सिद्ध झालंय. त्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मालेगावमधून पुढे येतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2013 01:27 PM IST

'मालेगाव स्फोट प्रकरणी एटीएस अधिकार्‍यांवर कारवाई करा'

मालेगाव 24 मे : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी चुकीचा तपास करून निष्पाप तरुणांचं आयुष्य उद्धवस्त करणार्‍या एटीएसच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मालेगावमधल्या पीडितांनी केली आहे. 2006 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएनं नुकतंच नवं आरोपपत्र दाखल केलंय.

या आरोपपत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माजी कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आलंय. 2006 मध्ये शब-ए-बारातच्या दिवशी मालेगावमध्ये बडा कब्रस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एटीएसनं मालेगावमधल्या सातजणांना अटक केली होती.

दरम्यान, स्फोटातले आरोपी साध्वी प्रज्ञासींग, कर्नल प्रसाद पुरोहित यांनीच 2006 चाही स्फोट घडवून आल्याचं पुढे आल्यानंतर तब्बल पाचवर्षांनंतर मालेगावमधल्या तरुणांची मुक्तता झाली. त्यामुळे एटीएसचा पहिला तपास चुकीच्या दिशेनं झाल्याचं सिद्ध झालंय. त्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मालेगावमधून पुढे येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2013 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close