S M L

'विंदूला ओळखतो, पण बेटिंग केलं नाही'

मुंबई 25 मे : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मध्यरात्री अटक झाली. मय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर आज किला कोर्टात हजर केलं. मय्यप्पनच्या चौकशीच्या तीन फेर्‍या पूर्ण झाल्यात. विंदू दारा सिंगला ओळखत असल्याची मय्यप्पनने कबुली दिली. पण मी कोणत्याही बेटिंगमध्ये सहभागी नाही, मी काहीही चूकीचं केलं नाही असं मय्यप्पनचं म्हणणं आहे. तर उद्या आयपीएलची फायनल मॅच होणार आहे आणि श्रीनिवासन यांच्या भवितव्याचा निर्णय फायनलनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्याविरोधा निलंबनाचा प्रस्ताव येऊ शकतो अशीही माहिती मिळतेय. तर मय्यप्पन यांच्या अटकेमुळे अडचणीत सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज टीम फायनल मॅच खेळेल आणि टीमचं निलंबन सध्यातरी होणार नाही अशी माहिती बीसीसीआय सूत्रांकडून मिळतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 09:31 AM IST

'विंदूला ओळखतो, पण बेटिंग केलं नाही'

मुंबई 25 मे : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मध्यरात्री अटक झाली. मय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर आज किला कोर्टात हजर केलं. मय्यप्पनच्या चौकशीच्या तीन फेर्‍या पूर्ण झाल्यात. विंदू दारा सिंगला ओळखत असल्याची मय्यप्पनने कबुली दिली. पण मी कोणत्याही बेटिंगमध्ये सहभागी नाही, मी काहीही चूकीचं केलं नाही असं मय्यप्पनचं म्हणणं आहे.

तर उद्या आयपीएलची फायनल मॅच होणार आहे आणि श्रीनिवासन यांच्या भवितव्याचा निर्णय फायनलनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्याविरोधा निलंबनाचा प्रस्ताव येऊ शकतो अशीही माहिती मिळतेय. तर मय्यप्पन यांच्या अटकेमुळे अडचणीत सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज टीम फायनल मॅच खेळेल आणि टीमचं निलंबन सध्यातरी होणार नाही अशी माहिती बीसीसीआय सूत्रांकडून मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close