S M L

फिक्सिंगवर माजी खेळाडूंचं 'झपिंग-झपांग' का नाही ?

मुंबई 25 मे : सहाव्या हंगामाच्या समारोपाकडे वाटचाल करणार्‍या आयपीएलच्या मानगुटीवर अचानक स्पॉट फिक्सिंगचं भूत बसलं. आणि भारतीय क्रिकेटला एकच हादरा बसला. राजस्थान रॉयल्स टीमचे खेळाडू एस श्रीसंत, अजित चंडिला, अंकित चव्हाण,अमित सिंग स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले. या फिक्सिंग प्रकरणाचे कनेक्शन बॉलिवूडमध्ये स्पष्ट झालेच तर डी कंपनीचा ही हात असल्याचा संशय व्यक्त होतं. मात्र क्रिकेटच्या इतिहासाची 'शुद्ध' पायभरणी करणारे जेष्ठ माजी क्रिकेटवीर या प्रकरणावर गप्प आहे. आयपीएलच्या मॅचेस् सुरू होण्याअगोदर 'एक्स्ट्रा इनिंग'मध्ये टीम काय खेळाडूच्या कामगिरीचा पाढा वाचणारे माजी क्रिकेटर काहीच का बोलत नाही ?. आता हे प्रकरण थेट बीसीसीआयच्या दारापाशी येऊन ठेपलंय. संपूर्ण भारतीय क्रिकेट जगत संकटात सापडलंय. पण या संपूर्ण प्रकरणी सुनील गावसकर, रवी शास्त्री, कपिल देव हे दिग्गज खेळाडू गप्प का ? हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. याच प्रकरणी आयबीएन लोकमतने हे सवाल उपस्थित केले आहेत. आयबीएन लोकमतचे सवाल- भारतीय क्रिकेमधील या वादळावर दिग्गज क्रिकेटर गप्प का ?- बोर्डाशी करार असलेले सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांनी वादावर साधं भाष्यही का केलं नाही ? - श्रीनिवासन आणि फ्रँचाईझी वादावर बोलण्यास बीसीसीआयनं माजी क्रिकेटर्सना मज्जाव केलाय का ? - स्पॉट फिक्सिंगचा निषेध करणार्‍या या दिग्गज खेळाडूंनी आणि कामेंटेटर्सनं श्रीनिवासन वादावर बोलणं हे जाणीवपूर्वक टाळलंय का ? आतापर्यंत कोण कोण फिक्सिंगप्रकरणी अटकेत ?एस श्रीसंत अजित चंडिलाअंकित चव्हाण अमित सिंगमाजी रणजीपटू बाबूराव यादवबॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगचेन्नई सुपर किंग्ज टीमचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पनअंपायर असद रौफ ( अटक नाही, सध्या पाकिस्तानात )

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 10:16 AM IST

फिक्सिंगवर माजी खेळाडूंचं 'झपिंग-झपांग' का नाही ?

मुंबई 25 मे : सहाव्या हंगामाच्या समारोपाकडे वाटचाल करणार्‍या आयपीएलच्या मानगुटीवर अचानक स्पॉट फिक्सिंगचं भूत बसलं. आणि भारतीय क्रिकेटला एकच हादरा बसला. राजस्थान रॉयल्स टीमचे खेळाडू एस श्रीसंत, अजित चंडिला, अंकित चव्हाण,अमित सिंग स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले.

या फिक्सिंग प्रकरणाचे कनेक्शन बॉलिवूडमध्ये स्पष्ट झालेच तर डी कंपनीचा ही हात असल्याचा संशय व्यक्त होतं. मात्र क्रिकेटच्या इतिहासाची 'शुद्ध' पायभरणी करणारे जेष्ठ माजी क्रिकेटवीर या प्रकरणावर गप्प आहे.

आयपीएलच्या मॅचेस् सुरू होण्याअगोदर 'एक्स्ट्रा इनिंग'मध्ये टीम काय खेळाडूच्या कामगिरीचा पाढा वाचणारे माजी क्रिकेटर काहीच का बोलत नाही ?. आता हे प्रकरण थेट बीसीसीआयच्या दारापाशी येऊन ठेपलंय. संपूर्ण भारतीय क्रिकेट जगत संकटात सापडलंय. पण या संपूर्ण प्रकरणी सुनील गावसकर, रवी शास्त्री, कपिल देव हे दिग्गज खेळाडू गप्प का ? हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. याच प्रकरणी आयबीएन लोकमतने हे सवाल उपस्थित केले आहेत.

आयबीएन लोकमतचे सवाल- भारतीय क्रिकेमधील या वादळावर दिग्गज क्रिकेटर गप्प का ?- बोर्डाशी करार असलेले सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांनी वादावर साधं भाष्यही का केलं नाही ? - श्रीनिवासन आणि फ्रँचाईझी वादावर बोलण्यास बीसीसीआयनं माजी क्रिकेटर्सना मज्जाव केलाय का ? - स्पॉट फिक्सिंगचा निषेध करणार्‍या या दिग्गज खेळाडूंनी आणि कामेंटेटर्सनं श्रीनिवासन वादावर बोलणं हे जाणीवपूर्वक टाळलंय का ?

आतापर्यंत कोण कोण फिक्सिंगप्रकरणी अटकेत ?

एस श्रीसंत अजित चंडिलाअंकित चव्हाण अमित सिंगमाजी रणजीपटू बाबूराव यादवबॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगचेन्नई सुपर किंग्ज टीमचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पनअंपायर असद रौफ ( अटक नाही, सध्या पाकिस्तानात )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close