S M L

प्रख्यात दिग्दर्शक राम गबाले यांचं निधन.

9 जानेवारी, पुणेप्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राम गबाले यांचं निधन झालं. मृत्यूसमयी ते 94 वर्षांचे होते. आज सकाळी सात वाजता पुण्यात त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला उत्तमोत्तम चित्रपट देऊन त्यांनी समृद्ध केलं. त्यांच्या निधनाने एक जाणता दिग्दर्शक हरपलाय. छत्रपती शिवाजी महाराज, देवबाप्पा, जशास तसे, मोठी माणसं, पोष्टातील मुलगी, जिव्हाळा, देव पावला, दूध भात, जोहार मायबाप, नरवीर तानाजी, हे त्यांचे मराठीतील सुप्रसिद्ध चित्रपट. तर तनहाई, बडी मा, फुल और कलिया, यासारखे चित्रपट दिग्दर्शित करून हिंदीतही त्यांनी योगदान दिलं. स्टोरी ऑफ डॉक्टर कर्वे या डॉक्युमेंटरीचंही त्यांनी दिग्दर्शन केलंय. राम नारायण गबाले हे त्यांचं पूर्ण नाव. 1914 साली त्यांचा जन्म झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 07:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close