S M L

गुरुनाथ मय्यप्पनला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई 25 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. गुरुनाथ मय्यप्पनला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. अभिनेता विंदू दारा सिंगला ओळखत असल्याची मय्यप्पनने कबुली दिली. पण मी कोणत्याही बेटिंगमध्ये सहभागी नाही, मी काहीही चूकीचं केलं नाही असं मय्यप्पनचं म्हणणं आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजता मय्यप्पन मदुराईहून मुंबईला येताच मुंबई क्राईमब्रांचनं त्यांना ताब्यात घेतलं. विंदू दारा सिंगच्या मदतीने मय्यप्पन बेटिंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्री मय्यप्पन यांच्या अटकेची घोषणा पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी केली. विंदू दारा सिंग आणि मय्यप्पन यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यानंतर आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याना 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी मय्यप्पनचे चारही मोबाईल जप्त केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 11:16 AM IST

गुरुनाथ मय्यप्पनला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई 25 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. गुरुनाथ मय्यप्पनला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. अभिनेता विंदू दारा सिंगला ओळखत असल्याची मय्यप्पनने कबुली दिली. पण मी कोणत्याही बेटिंगमध्ये सहभागी नाही, मी काहीही चूकीचं केलं नाही असं मय्यप्पनचं म्हणणं आहे.

शुक्रवारी रात्री 8 वाजता मय्यप्पन मदुराईहून मुंबईला येताच मुंबई क्राईमब्रांचनं त्यांना ताब्यात घेतलं. विंदू दारा सिंगच्या मदतीने मय्यप्पन बेटिंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्री मय्यप्पन यांच्या अटकेची घोषणा पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी केली.

विंदू दारा सिंग आणि मय्यप्पन यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यानंतर आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याना 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी मय्यप्पनचे चारही मोबाईल जप्त केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close