S M L

फिक्सर अंपायर रौफचं पाकमध्ये पलायन

नवी दिल्ली 25 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांचं नावही पुढे आलं होतं. पण पोलिसांनी अभिनेता विंदू दारा सिंगला अटक केल्यानंतर रौफ तातडीने पाकिस्तानात पळून गेल्याचं पुढे आलंय. विंदूचे असद रौफ यांच्यासोबतही संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रौफ यांना समन्स पाठवण्याची तयारी केली होती. पण त्यापूर्वीच 20 मे रोजी रौफ पाकिस्तानमध्ये निघून गेले. रौफ यांच्यासाठी विंदू आणि प्रेम तनेजा याने पाठवलेल्या गिफ्टच्या दोन बॅगा दिल्ली विमानतळावर जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पवन जयपूर आणि संजय जयपूर या दोन बुकींना दुबईला पळून जाण्यास मदत करणार्‍या विंदूने राजा आणि चित्तू या आणखी दोन बुकींनाही पळून जाण्यास मदत केल्याची कबुली दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 12:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close