S M L

कोल्हापूरकरांची टोल वसुलीतून तुर्तास सुटका

कोल्हापूर 25 मे : इथं आयआरबी कंपनीच्या टोलवसुलीविरोधी आंदोलन होणार होतं. मात्र आज इथं टोलवसुली झालीच नाही. आजपासून होणारी टोलवसुली काही काळासाठी तरी टळली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. आयआरबी कंपनीच्यावतीने शहरातल्या नऊ टोलनाक्यांवर आजपासून टोलवसुली होणार होती. आंदोलन होणार म्हणून याठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना मात्र टोलमधून वगळण्यात आलंय. या टोलला टोल विरोधी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 01:10 PM IST

कोल्हापूरकरांची टोल वसुलीतून तुर्तास सुटका

कोल्हापूर 25 मे : इथं आयआरबी कंपनीच्या टोलवसुलीविरोधी आंदोलन होणार होतं. मात्र आज इथं टोलवसुली झालीच नाही. आजपासून होणारी टोलवसुली काही काळासाठी तरी टळली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आयआरबी कंपनीच्यावतीने शहरातल्या नऊ टोलनाक्यांवर आजपासून टोलवसुली होणार होती. आंदोलन होणार म्हणून याठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना मात्र टोलमधून वगळण्यात आलंय. या टोलला टोल विरोधी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close