S M L

'राजीनामा देणार नाही'

कोलकाता 26 मे : मी कोणतेही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. तसंच बीसीसीआयमध्ये कोणतेही मतभेद नसून मी राजीनामा द्यावा यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही असंही श्रीनिवासन यांनी सांगितलं. जावई गुरूनाथ मय्यप्पन यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे मय्यप्पन जर दोषी आढळले तर शिक्षा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरनाथ मय्यप्पन स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत आहेत. अभिनेता विंदू दारा सिंगने दिलेल्या कबुली जबाबात मय्यप्पन कोट्यावधी रुपयांची बेटिंग लावत होता असं चौकशीतून निष्पण झालंय. विंदूने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी मय्यप्पनला शुक्रवारी मध्यरात्री चौकशीनंतर अटक केली. मय्यप्पन यांने विंदूला ओळखतो पण बेटिंग केलं नाही असं चौकशीत सांगितलं. जावयाच्या अटकेमुळे श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. मात्र मी कोणतीही चुकी केली नाही आणि राजीनामा देणार नाही असं स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. बीसीसीआय पोलिसांना तपासकार्यात पूर्ण मदत करेल. मय्यप्पन यांच्या नियुक्तीत माझा कोणताही रोल नव्हता. फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मय्यप्पनच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे जर मय्यप्पन दोषी आढळला तर त्याला शिक्षा केली जाईल असंही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 11:46 PM IST

'राजीनामा देणार नाही'

कोलकाता 26 मे : मी कोणतेही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. तसंच बीसीसीआयमध्ये कोणतेही मतभेद नसून मी राजीनामा द्यावा यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही असंही श्रीनिवासन यांनी सांगितलं. जावई गुरूनाथ मय्यप्पन यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे मय्यप्पन जर दोषी आढळले तर शिक्षा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरनाथ मय्यप्पन स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत आहेत. अभिनेता विंदू दारा सिंगने दिलेल्या कबुली जबाबात मय्यप्पन कोट्यावधी रुपयांची बेटिंग लावत होता असं चौकशीतून निष्पण झालंय. विंदूने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी मय्यप्पनला शुक्रवारी मध्यरात्री चौकशीनंतर अटक केली. मय्यप्पन यांने विंदूला ओळखतो पण बेटिंग केलं नाही असं चौकशीत सांगितलं. जावयाच्या अटकेमुळे श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. मात्र मी कोणतीही चुकी केली नाही आणि राजीनामा देणार नाही असं स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. बीसीसीआय पोलिसांना तपासकार्यात पूर्ण मदत करेल. मय्यप्पन यांच्या नियुक्तीत माझा कोणताही रोल नव्हता. फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मय्यप्पनच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे जर मय्यप्पन दोषी आढळला तर त्याला शिक्षा केली जाईल असंही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 11:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close