S M L

सेनेनं मित्रपक्षावरच सोडले 'कलम'बाण

मुंबई 28 मे : शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या महायुतीत येण्यासाठी मनसेचे राज ठाकरें यांच्यासाठी दार किलकिलं करू पाहणार्‍या नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्यावर सेनेचं मुखपत्र सामना दैनिकाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खरपुस समाचार घेतला. ठाकरे बंधूंना एकत्र आणणारच या नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचीही खिल्ली उडवण्यात आलीय. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला तर युतीत तिसराही मित्र नको आणि चौथाही नको आहे, मग याबाबत महाराष्ट्र भाजपचं ऐकायचं की दिल्ली भाजपचं असा सवालही उपस्थित करण्यात आला. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळे भाजपला गटांगळ्या खाव्या लागत असल्याची तिखट शब्दात टीकाही करण्यात आली. राज्यात काय करायचे हे ठरवायला शिवसेना समर्थ असल्याचा टोमणाही लगावण्यात आलाय. युतीची दारे खिडक्या किलकिल्या करून भलत्यालाच शुक-शुक कऱण्यापेक्षा आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटातटाचे दरवाजे उघडून भक्कम भीमशक्तीची बांधणी करावी असा सल्लाही उद्धव यांनी आठवलेंना दिला. यानंतर दुपारी आठवलेंनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची भेट रंगशारदामध्ये भेट घेतली. यावेळी महायुतीबाबत चर्चा झाली.'सामना'त भाजप-आठवलेंवर टीकामहाराष्ट्राच्या राजकारणात 'टाळी' ला इतके महत्त्व येईल, असे कधी वाटले नव्हते. पण, शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतल्या मित्रवर्यांनी स्वत:ची राजकीय कामं सोडून आपल्या पक्ष कार्यालयात 'टाळी-मृदंगा'चे क्लासेस काढलेले दिसतात व क्लासेसला विद्यार्थी मिळत नसल्याने एका हाताने टाळी व दुसर्‍या हाताने मृदुंगावर थाप मारताना आम्ही पाहत आहोत. 'कमळा'वरही तिरकस बाणविडा उचलून उपयोग काय? विडा रंगावा लागतो, त्यात कात, चुना, सुपारी व गुलकंदाचे प्रमाणही नीट असावे लागते. उचलला विडा आणि टाकला तोंडात असे होत नाही. पुन्हा विड्यात कुणी नशेबाज तमाखू आणि गुटखा वगैरे मिसळला असेल तर सर्व विडेकरी गरगरून पडतील व आजच्या 'युती'लाच त्याचा फटका बसेल. भाजप-आठवलेंवर टीकावर्‍हाडमंडळी तयार असली तरी आठवले काय किंवा भाजपमधील मित्रवर्य काय, येणार्‍यांच्या ताटात टाकण्यासाठी तुम्ही तुमचे ताट रिकामे करणार आहात काय? म्हणजे पंगतीचे आमंत्रण मित्रांनी द्यायचे व पाहुण्यांच्या 'लॉजिंग-बोर्डिंग'सह सगळी व्यवस्था शिवसेनेने करायची, अशा धर्मादाय कार्यक्रमात आम्हाला तरी मजा वाटत नाही. मुळात रामदास आठवले यांनी महायुतीच्या दारे-खिडक्या किलकिल्या करून भलत्यांनाच 'शुक-शुक' करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या इतर सर्व गटातटांसाठी दरवाजे उघडून भक्कम भीमशक्तींची बांधणी करायला हवी.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2013 02:25 PM IST

सेनेनं मित्रपक्षावरच सोडले 'कलम'बाण

मुंबई 28 मे : शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या महायुतीत येण्यासाठी मनसेचे राज ठाकरें यांच्यासाठी दार किलकिलं करू पाहणार्‍या नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्यावर सेनेचं मुखपत्र सामना दैनिकाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खरपुस समाचार घेतला. ठाकरे बंधूंना एकत्र आणणारच या नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचीही खिल्ली उडवण्यात आलीय. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला तर युतीत तिसराही मित्र नको आणि चौथाही नको आहे, मग याबाबत महाराष्ट्र भाजपचं ऐकायचं की दिल्ली भाजपचं असा सवालही उपस्थित करण्यात आला.

हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळे भाजपला गटांगळ्या खाव्या लागत असल्याची तिखट शब्दात टीकाही करण्यात आली. राज्यात काय करायचे हे ठरवायला शिवसेना समर्थ असल्याचा टोमणाही लगावण्यात आलाय. युतीची दारे खिडक्या किलकिल्या करून भलत्यालाच शुक-शुक कऱण्यापेक्षा आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटातटाचे दरवाजे उघडून भक्कम भीमशक्तीची बांधणी करावी असा सल्लाही उद्धव यांनी आठवलेंना दिला. यानंतर दुपारी आठवलेंनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची भेट रंगशारदामध्ये भेट घेतली. यावेळी महायुतीबाबत चर्चा झाली.

'सामना'त भाजप-आठवलेंवर टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात 'टाळी' ला इतके महत्त्व येईल, असे कधी वाटले नव्हते. पण, शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतल्या मित्रवर्यांनी स्वत:ची राजकीय कामं सोडून आपल्या पक्ष कार्यालयात 'टाळी-मृदंगा'चे क्लासेस काढलेले दिसतात व क्लासेसला विद्यार्थी मिळत नसल्याने एका हाताने टाळी व दुसर्‍या हाताने मृदुंगावर थाप मारताना आम्ही पाहत आहोत.

'कमळा'वरही तिरकस बाणविडा उचलून उपयोग काय? विडा रंगावा लागतो, त्यात कात, चुना, सुपारी व गुलकंदाचे प्रमाणही नीट असावे लागते. उचलला विडा आणि टाकला तोंडात असे होत नाही. पुन्हा विड्यात कुणी नशेबाज तमाखू आणि गुटखा वगैरे मिसळला असेल तर सर्व विडेकरी गरगरून पडतील व आजच्या 'युती'लाच त्याचा फटका बसेल.

भाजप-आठवलेंवर टीका

वर्‍हाडमंडळी तयार असली तरी आठवले काय किंवा भाजपमधील मित्रवर्य काय, येणार्‍यांच्या ताटात टाकण्यासाठी तुम्ही तुमचे ताट रिकामे करणार आहात काय? म्हणजे पंगतीचे आमंत्रण मित्रांनी द्यायचे व पाहुण्यांच्या 'लॉजिंग-बोर्डिंग'सह सगळी व्यवस्था शिवसेनेने करायची, अशा धर्मादाय कार्यक्रमात आम्हाला तरी मजा वाटत नाही. मुळात रामदास आठवले यांनी महायुतीच्या दारे-खिडक्या किलकिल्या करून भलत्यांनाच 'शुक-शुक' करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या इतर सर्व गटातटांसाठी दरवाजे उघडून भक्कम भीमशक्तींची बांधणी करायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2013 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close