S M L

'श्रीनिवासन राजीनामा द्याच'

मुंबई 29 मे : बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत चाललाय. चौकशी पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी पदावरून पायउतार व्हावं अशी मागणी मध्य प्रदेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली होती आता शिंदे यांच्या मागणीनंतर आज आयपीलचे चेअरमन राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनीही या मागणीचा पुनरुच्चार केला. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांची काही वेळापूर्वी भेट घेतली. अरुण जेटली बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे सदस्य आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने चौकशी समिती स्थापन केलीय. त्याचा निर्णय येईपर्यंत श्रीनिवासन यांनी स्वतःला दूर ठेवावं असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. या मागणीला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयवर बोचरी टीका केलीय. बीसीसीआयही अतिशय भ्रष्ट आणि हास्यास्पद संस्था असल्याची टीका आझाद यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2013 02:28 PM IST

'श्रीनिवासन राजीनामा द्याच'

मुंबई 29 मे : बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत चाललाय. चौकशी पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी पदावरून पायउतार व्हावं अशी मागणी मध्य प्रदेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली होती आता शिंदे यांच्या मागणीनंतर आज आयपीलचे चेअरमन राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनीही या मागणीचा पुनरुच्चार केला.

आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांची काही वेळापूर्वी भेट घेतली. अरुण जेटली बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे सदस्य आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने चौकशी समिती स्थापन केलीय. त्याचा निर्णय येईपर्यंत श्रीनिवासन यांनी स्वतःला दूर ठेवावं असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

या मागणीला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयवर बोचरी टीका केलीय. बीसीसीआयही अतिशय भ्रष्ट आणि हास्यास्पद संस्था असल्याची टीका आझाद यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2013 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close