S M L

'IPLच्या सर्व मॅचेस्‌ची चौकशी करा'

मुंबई 29 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवारांनी अखेर मौन सोडलं. शरद पवारांनी श्रीनिवासन यांच्यावर कडाडून टीका केली. आयपीएल-6 मधल्या सर्व सामन्यांची गृहमंत्रालयाकडून चौकशी व्हावी अशी मागणी पवार केलीयं. पवारांच्या या वक्तव्यांमुळे श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी आता दबाव वाढला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राजीव शुक्ला आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरूण जेटलींनीही श्रीनिवासनवर टीका केली. चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांची खुर्ची धोक्यात आली.जावई मय्यप्पन याला अटक झाल्यामुळे विरोधकांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एव्हान बीसीसीआयनेही तसे संकेतही दिले होते. पण श्रीनिवासन यांनी मी काही चुकीचे केले नाही त्यामुळे राजीनामा देणार नाही असा दावा केला. मय्यप्पनच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात करण्यात आली. पण त्याचा दावा विरोधकांनी धुडकावून लावला. श्रीनिवासन यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी लावून धरली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादीने त्रिपाठींचे हे व्यक्तीगत मत होते असं सांगून प्रकरणातून अंग काढलं. पण आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार 'बॅटिंग' केलीय. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकार उघड झाल्यामुळे मला खूप दुख झालं. या प्रकरणात दोषी आढळणार्‍या सर्व खेळाडूंवर कठोर कारवाई करावी. तसंच सर्वच सामन्यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली. सध्या जे काही बीसीसीआयमध्ये सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायक आहे. श्रीनिवासन यांनी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं पाहिजे असा सल्लाही पवारांनी श्रीनिवासन यांना दिला. एकीकडे श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढत आहे. आता मात्र खुद्द शरद पवार यांनी श्रीनिवासन यांच्यावर टीका केल्यामुळे श्रीनिवासन यांच्या विरोधकांना आणखी बळ मिळालंय. त्यामुळे श्रीनिवासन यांना येणार काळ आणखी कठीण जाणार आहे एवढे यावरून स्पष्ट होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2013 12:57 PM IST

'IPLच्या सर्व मॅचेस्‌ची चौकशी करा'

मुंबई 29 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवारांनी अखेर मौन सोडलं. शरद पवारांनी श्रीनिवासन यांच्यावर कडाडून टीका केली. आयपीएल-6 मधल्या सर्व सामन्यांची गृहमंत्रालयाकडून चौकशी व्हावी अशी मागणी पवार केलीयं. पवारांच्या या वक्तव्यांमुळे श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी आता दबाव वाढला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राजीव शुक्ला आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरूण जेटलींनीही श्रीनिवासनवर टीका केली.

चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांची खुर्ची धोक्यात आली.जावई मय्यप्पन याला अटक झाल्यामुळे विरोधकांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एव्हान बीसीसीआयनेही तसे संकेतही दिले होते. पण श्रीनिवासन यांनी मी काही चुकीचे केले नाही त्यामुळे राजीनामा देणार नाही असा दावा केला. मय्यप्पनच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात करण्यात आली. पण त्याचा दावा विरोधकांनी धुडकावून लावला. श्रीनिवासन यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी लावून धरली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादीने त्रिपाठींचे हे व्यक्तीगत मत होते असं सांगून प्रकरणातून अंग काढलं.

पण आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार 'बॅटिंग' केलीय. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकार उघड झाल्यामुळे मला खूप दुख झालं. या प्रकरणात दोषी आढळणार्‍या सर्व खेळाडूंवर कठोर कारवाई करावी. तसंच सर्वच सामन्यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.

सध्या जे काही बीसीसीआयमध्ये सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायक आहे. श्रीनिवासन यांनी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं पाहिजे असा सल्लाही पवारांनी श्रीनिवासन यांना दिला. एकीकडे श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढत आहे. आता मात्र खुद्द शरद पवार यांनी श्रीनिवासन यांच्यावर टीका केल्यामुळे श्रीनिवासन यांच्या विरोधकांना आणखी बळ मिळालंय. त्यामुळे श्रीनिवासन यांना येणार काळ आणखी कठीण जाणार आहे एवढे यावरून स्पष्ट होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2013 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close