S M L

मुंबई उपनगरामध्ये लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त

मुंबई 30 मे : मागठणे,अंधेरी, बोरिवली, कलीना या उपनगरामधल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचं समोर आलंय. लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या जास्त आहे. तब्बल 4 लाख जास्त मतदार असल्याचं मतदार यादीवरून स्पष्ट होतंय. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेतल्यानंतर राज्यातल्या निवडणूक अधिकार्‍यांना जाग आली. आता या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आता घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करण्याचं काम सुरू आहे. शोध मतदारांचा- मुंबई उपनगराची लोकसंख्या आहे 96 लाख 30 हजार- मतदानाचं वय लक्षात घेता 68 लाख 63 हजार मतदार असणं अपेक्षित आहे - पण एकूण 72 लाख 57 हजार मतदारांची नोंदणी झालीय - म्हणजे एकूण 4 लाख मतदार जास्त आहे- मुंबई उपनगरामध्ये एकूण 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघात 2 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत जास्त मतदार नोंदले गेलेत - मागठणेमध्ये 20 टक्के जास्त नावं, त्याखालोखाली अंधेरी मतदारसंघात 19 टक्के, बोरिवलीमध्ये 17 टक्के कलीना मतदारसंघात 2 टक्के जास्त- मतदारांची संख्या जास्त होण्यामागे पत्ते बदलणं, मृत्यूनंतरही नाव यादीत असणं, व्होटर आयडी ड्युपलिकेशन आणि बोगस मतदार अशी वेगवेगळी कारणं आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2013 10:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2013 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close