S M L

सत्यमच्या कर्मचार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण

9 जानेवारीसत्यम कंपनीमधल्या महाघोटाळ्यामुळं तिथल्या कर्मचार्‍यांची अवस्था गोंधळल्यासारखी झालीय. गुरुवारच्या एका दिवसात सत्यममधल्या चौदा हजार कर्मचार्‍यांनी कंपनीबाहेर पडण्याचे प्रयत्न चालवले. हैद्राबादला सत्यमचं हेडक्वार्टर आहे. पुण्यातही सत्यमचे साडेतीन हजार कर्मचारी आहेत. कर्मचार्‍यांचा विश्वास कायम रहावा यासाठी कंपनी सर्व प्रयत्न करत असल्याचं मॅनेजमेंटनं सांगितलंयकंपनीसाठी आपण एकत्र लढाई लढू आणि जिंकू... मॅनेजमेंटनं पाठवलेले हे ई-मेल सध्या सत्यममध्ये प्रत्येकाला येतायत. सत्यममध्ये एकूण त्रेपन्न हजार कर्मचारी आहेत. पण कंपनीची सध्याची स्थिती पाहून सर्वांवरच काळजीचं दाट सावट पसरलंय. सत्यमचे नवे सीईओ आणि त्यांची नवी टिम कंपनीची ही वाईट परिस्थती लवकरच पालटेल असा विश्वास कर्मचार्‍यांना देतेय. अरविंद आणि रघू कांशीसारखे काही कर्मचारीदेखील सहकार्‍यांना धीर देतायत. "आमचे ग्राहक आमच्या कामावर खूष आहेत..आणि हीच आमची क्रेडिबलिटी आहे" असं रघू कांशी यांनी सांगितलं.कॅमेरासमोर बोलायला सत्यमचे कर्मचारी अजून कचरतायत पण सुमारे चौदा हजार कर्मचार्‍यांनी त्यांचे सीव्हीज हेडहंटर या जॉब रिक्रुटमेंट कंपनीला पाठवलेत. सत्यममधून बाहेर पडून नवी स्वच्छ सुरूवात करु असंच सर्वांना वाटतंय.कर्मचार्‍यांमध्ये कंपनीबद्दलचा विश्वास ढळू नये यासाठी सत्यमनं प्रयत्न चालवलेयत. पण कंपनीचा दर्जा एवढा खालावल्यानंतर नोकरी सोडून जाणार्‍या कर्मचार्‍यांना रोखणं मॅनेजमेंटला कठीण जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 04:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close