S M L

3 भारतीयांना ग्रॅमी नॉमिनेशन

9 जानेवारीग्रॅमी अ‍ॅवॉर्डसारखा प्रतिष्ठित अ‍ॅवॉर्ड पं. रवी शंकर आणि पं. विश्व मोहन भट्ट या दोन भारतीयांनी मिळवला आहे. पण यावेळी तीन भारतीय कलाकारांचं वेगवेगळ्या कॅटॅगरीसाठी नॉमिनेशन झालं आहे. एक प्रकारे हा भारतीय संगीताचा जागतिक पातळीवर गौरवच आहे.देबाशीष भट्टाचार्य शास्रीय संगीतकार देबाशीषने गिटारचं आधुनिकीकरण केलं. त्याच्या संशोधनातून चतुरंगी, गंधर्वी आणि आंधी अशी तीन रूपं साकारली. पण हे काही एवढ्यावरच थांबलं नाही. त्याच्या कलकत्ता क्रोनिकल्स आल्बमला सर्वोत्कृष्ट पारंपरिक संगीताचं ग्रॅमी नॉमिनेशन मिळालं. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तो रागदारी शिकतोय आणि आज हे मोठं नॉमिनेशन झाल्यावर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वळलंय. गॅमीबद्दल त्याला विचारलं असता देबाशीष सांगतो मला संगीताचा वारसा आईवडिलांकडून, माझ्या गुरुकडून आणि देवाकडून मिळाला.तेव्हा माझं असं काही नाही. हा माझा गौरव नसून संगीताचा आहे.लुईस बँक्सच्या दोन जॅझ आल्बमनाही नॉमिनेशन मिळालं आहे. कन्टेम्पररी कॅटेगरीत त्याला नॉमिनेशन मिळालं आहे. गॅमी नॉमिनेशनमुळे भारतीय जॅझ आर्टिस्टना शेवटी स्वत:ची ओळख मिळाली. लुईसनं आपलं अख्खं आयुष्य जॅझसाठीच घालवलं, माइल्स फ्रॉम इंडिया या आल्बमचा प्रोड्युसरही तोच आहे.लुईस सांगतो, हे नॉमिनेशन मला नाही मिळालं तर आल्बमला मिळालंय.तिसरं नॉमिनेशन आहे लक्ष्मी शंकर यांना. त्यांच्या डान्सिंग इन द लाइट आल्बमला ग्रॅमी नॉमिनेशन मिळालं आहे. मग ते वयाच्या 80व्या वर्षी का असेना या तीन ग्रॅमी नॉमिनेशनमुळे भारतीय संगीताचं महत्त्व वाढलंय, हे मात्र नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 02:34 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close