S M L

श्रीनिवासन 'नॉटआऊट', दालमियांचं कमबॅक

चेन्नई 02 जुन : बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन राजीनामा देतील, श्रीनिवासन यांची हकालपट्टी होईल, श्रीनिवासन स्वत:हून राजीनामा देतील...अखेर श्रीनिवासन 'नॉटआऊट' राहत अध्यक्षपदाच्या 'मॅच'मधून फक्त बाजूला झाले आहेत. त्यांच्या जागी आता पुन्हा एकदा जगमोहन दालमियांची पुन्हा एंट्री झालीय. दालमियांकडे सप्टेंबरपर्यंतचा कारभार सोपण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अध्यक्षपदाचा या सामन्यातही फिक्सिंग झालं अशी चर्चा आता सुरू झालीय.आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटला एकच हादरा बसला. राजस्थान रॉयलचे खेळाडू एस. श्रीसंत, अकिंत चव्हाण, अजित चंडिला यांना अटक झालीच पण यानंतर बुकींनी जी काही कबुली दिली त्यामुळे दररोज आयपीएलच्या प्रतिष्ठाचे वाभाडे निघाले. याच प्रकरणी अभिनेता विंदू दारा सिंगला अटक झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यप्पन प्रकाशझोतात आले. कोट्यावधीची बेटिंग लावल्याचं उघड झाल्यामुळे श्रीनिवासन यांचे जावईबापू गजाआड गेले. मय्यप्पनच्या अटकेमुळे श्रीनिवासन यांची खुर्ची धोक्यात आली. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र श्रीनिवासन यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर ताशेरे ओढत श्रीनिवासन नकोत असं स्पष्ट केलं. पवारांच्या इनिंगनंतर श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावाच यासाठी विरोधक गट आणखी सक्रिय झाला. तर दुसरीकडे आयसीसीने मय्यप्पन बुकींच्या संपर्कात होता असा इशारा बीसीसीआयला दिला होता पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं अशी 'गुगली' टाकली. त्यामुळे श्रीनिवासन यांची खुर्ची आणखी धोक्यात आली. शुक्रवारी या नाट्यात आणखी भर पडली ती संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी राजीनामे देऊ केले. अखेरीस आज बीसीसीआयने चेन्नईत फायनल बैठक बोलावलीच. पण या बैठकीत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर श्रीनिवासन यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आलं पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही आणि त्यांनीही दिला नाही. एकंदरीतच ज्या दालमियांना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाचा कारभार देण्यात आला आहे. बीसीसीआयचं अधिकृत पत्रक एन श्रीनिवासन हे राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या दैनदिन कारभारात ते लक्ष घालणार नाहीत. त्यांच्याएवेजी जगमोहन दालमिया हे हंगामी अध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. तसंच या बैठकीत संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी आपापले राजीनामे मागे घ्यावे अशीही विनंती केली. पण जगदाळे यांनी मात्र आपला राजीनामा मागे घेण्यास नकार दिलाय. दिशाभूल करण्यासाठी बैठक -आझाददरम्यान, किर्ती आझाद यांनी मात्र बीसीसीआयच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. बीसीसीआयची बैठक ही केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी बोलावली गेली होती अशी टीका त्यांनी केली. जगमोहन दालमिया यांची कारकीर्दबीसीसीआयच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया यांची निवड झालीय. दालमिया हे सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. सध्या दालमिया हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अनुराग ठाकूर यांनी दालमियांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजूरही करण्यात आला. जगमोहन दालमिया हे भारतीय क्रिकेट बोर्डातले एक वजनदार प्रस्थ मानलं जातं. या क्षेत्रात त्यांचा अनुभवही दांडगा आहे. - आयसीसीचे माजी अध्यक्ष (1997 ते 2000)- बीसीसीआयचे माजी अध्यक्ष - बीसीसीआयचे माजी खजिनदार - 2006 साली दालमियांवर भ्रष्टाचाराचे आरोप- 2006 साली बीसीसीआयमधून हकालपट्टी- 2007 साली पुन्हा एकदा CAB चे अध्यक्ष

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2013 01:40 PM IST

श्रीनिवासन 'नॉटआऊट', दालमियांचं कमबॅक

चेन्नई 02 जुन : बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन राजीनामा देतील, श्रीनिवासन यांची हकालपट्टी होईल, श्रीनिवासन स्वत:हून राजीनामा देतील...अखेर श्रीनिवासन 'नॉटआऊट' राहत अध्यक्षपदाच्या 'मॅच'मधून फक्त बाजूला झाले आहेत. त्यांच्या जागी आता पुन्हा एकदा जगमोहन दालमियांची पुन्हा एंट्री झालीय. दालमियांकडे सप्टेंबरपर्यंतचा कारभार सोपण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अध्यक्षपदाचा या सामन्यातही फिक्सिंग झालं अशी चर्चा आता सुरू झालीय.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटला एकच हादरा बसला. राजस्थान रॉयलचे खेळाडू एस. श्रीसंत, अकिंत चव्हाण, अजित चंडिला यांना अटक झालीच पण यानंतर बुकींनी जी काही कबुली दिली त्यामुळे दररोज आयपीएलच्या प्रतिष्ठाचे वाभाडे निघाले. याच प्रकरणी अभिनेता विंदू दारा सिंगला अटक झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यप्पन प्रकाशझोतात आले.

कोट्यावधीची बेटिंग लावल्याचं उघड झाल्यामुळे श्रीनिवासन यांचे जावईबापू गजाआड गेले. मय्यप्पनच्या अटकेमुळे श्रीनिवासन यांची खुर्ची धोक्यात आली. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र श्रीनिवासन यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर ताशेरे ओढत श्रीनिवासन नकोत असं स्पष्ट केलं. पवारांच्या इनिंगनंतर श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावाच यासाठी विरोधक गट आणखी सक्रिय झाला. तर दुसरीकडे आयसीसीने मय्यप्पन बुकींच्या संपर्कात होता असा इशारा बीसीसीआयला दिला होता पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं अशी 'गुगली' टाकली. त्यामुळे श्रीनिवासन यांची खुर्ची आणखी धोक्यात आली.

शुक्रवारी या नाट्यात आणखी भर पडली ती संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी राजीनामे देऊ केले. अखेरीस आज बीसीसीआयने चेन्नईत फायनल बैठक बोलावलीच. पण या बैठकीत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर श्रीनिवासन यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आलं पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही आणि त्यांनीही दिला नाही. एकंदरीतच ज्या दालमियांना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाचा कारभार देण्यात आला आहे. बीसीसीआयचं अधिकृत पत्रक

एन श्रीनिवासन हे राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या दैनदिन कारभारात ते लक्ष घालणार नाहीत. त्यांच्याएवेजी जगमोहन दालमिया हे हंगामी अध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. तसंच या बैठकीत संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी आपापले राजीनामे मागे घ्यावे अशीही विनंती केली. पण जगदाळे यांनी मात्र आपला राजीनामा मागे घेण्यास नकार दिलाय.

दिशाभूल करण्यासाठी बैठक -आझाद

दरम्यान, किर्ती आझाद यांनी मात्र बीसीसीआयच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. बीसीसीआयची बैठक ही केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी बोलावली गेली होती अशी टीका त्यांनी केली.

जगमोहन दालमिया यांची कारकीर्द

बीसीसीआयच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया यांची निवड झालीय. दालमिया हे सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. सध्या दालमिया हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अनुराग ठाकूर यांनी दालमियांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजूरही करण्यात आला. जगमोहन दालमिया हे भारतीय क्रिकेट बोर्डातले एक वजनदार प्रस्थ मानलं जातं. या क्षेत्रात त्यांचा अनुभवही दांडगा आहे. - आयसीसीचे माजी अध्यक्ष (1997 ते 2000)- बीसीसीआयचे माजी अध्यक्ष - बीसीसीआयचे माजी खजिनदार - 2006 साली दालमियांवर भ्रष्टाचाराचे आरोप- 2006 साली बीसीसीआयमधून हकालपट्टी- 2007 साली पुन्हा एकदा CAB चे अध्यक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2013 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close