S M L
  • दुष्काळग्रस्तांना जैन पाईप्सचा मदतीचा हात

    Published On: Jun 3, 2013 02:47 PM IST | Updated On: Jun 3, 2013 02:47 PM IST

    सिध्दार्थ गोदाम, बीडबीड 03 जुन : मराठवाड्यातील दुष्काळी भागात अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. बीडमधल्या गेवराईमधल्या मरकाळा भागात घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी जळगावच्या जैन पाईप्सनं अशीच मदत केली आहे. बीड जिल्ह्यातलं मिरकाळा गाव..दुष्काळात गावाला पुरवठा करणारा तलाव आटला..भीषण पाणीटंचाई निर्माण झाली..गावाच्या तळ्यातच शासकीय योजनेतून विहीर खोदली आणि विहिरीला भरपूर पाणी लागलं. मात्र योजनेचा पैसा संपला. तलावाच्या विहिरीतलं पाणी गावात न्यायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला...पण बीडचे मुख्याधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी मदतीसाठी हाक दिली आणि जैन पाईप्सनं मिरकाळा गावाला पाईप्स मोफत पुरविले.बीड जिल्ह्यातल्या फक्त एकच नाही तर जवळपास 30 गावांना मोफत पाईप्स पुरवण्याचा निर्णय जैन पाईप्सनं घेतला. मिरकाळ्ा गावाला शासकीय योजनेतून विहीर मिळाली. जैन पाईप्सनं मोफत पाईप्स दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाईप्स ची जोडणी केली आणि विहीर खोदकामात श्रमदानं केलं.आपली सामाजिक जबाबदारी ओळखून जैन पाईप्ससारख्या अनेक संघटनांनी दुष्काळी भागात आपल्या परीनं असा मदतीचा हात दिलाय. त्यामुळेच दुष्काळाची धग काहीशी सुसह्य झाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close