S M L

26/11 मागे पाकिस्तानच

10 जानेवारीमुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा कसा होत होता, पाकिस्तानच्या जमिनीवरून भारतावर कसा दहशतवादी हल्ला करण्यात आला याचे पुरावे भारतानं पाकिस्तानला सोपवलेत. यापैकी काही पुरावे आयबीएन लोकमतलाही मिळालेत. या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं की मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता. या कागदपत्रांत काही धक्कादायक माहिती आहे.मुंबई हल्ल्यात दहा दहशतवाद्यांनी भाग घेतला होता. पण प्रत्यक्ष 32 दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं असं या कागदपत्रातून स्पष्ट होतंय. त्यांना आत्मखातकी पथकासारखं खडतर ट्रेनिंग देण्यात आलं. त्यातील 13 जणांना मुंबई हल्ल्यासाठी निवडण्यात आलं. पण या 13 पैकी 6 जणांना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आलं. तर नव्या 3 जणांना अगोदरच्या 7 जणांच्या टीममध्ये सामील करण्यात आलं. हल्ल्यापूर्वी त्यांना एका घरात कोंडून ठेवण्यात आलं. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क येऊ दिला गेला नाही.22 नोव्हेंबर 2008. सकाळी 8.00वी वेळ. कराची बंदरातून हे 10 दहशतवादी एका छोट्या बोटीतून निघाले. 40 मिनिटांच्या प्रवासानंतर अल हुसैनी या बोटीत ते बसले. ही अल हुसैनी बोटीचा मालक होता झकीर उर रहमान लखवी म्हणजेच लष्कर ए तय्यबा या क्रूर दहशतवादी संघटनेचा प्रमुख. कसाब आणि दहा दहशतवादी या बोटीत चढण्यापूर्वी बोटीत 7जण होते. ते लष्कर ए तोयबाचे सदस्य होते. त्यांनी ही बोट कसाब आणि त्याच्या साथीदारांना दिली. त्यांचा प्रवास सुरू झाला. एक दिवस प्रवास केल्यानंतर त्यांनी एक भारतीय बोट ताब्यात घेतली. नाव अल कुबेर. बोटीच्या 4 खलाशांना ठार मारून आणि कॅप्टनला अपहरण करून ते मुंबईच्या जवळ आले. अल कुबेरवरून मुंबईला येईपर्यंत प्रवासात बोटीवर प्रत्येक जण आळी पाळीनं पहारा द्यायचे. पहाटे 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 3-3 जण बोटीवर पहारा द्यायचे. त्यानंतर एक जण टेहळणीवर असायचा. भारतीय नौदलाच्या बोटी आणि कोस्टगार्डच्या बोटी यांच्या हालचालींची माहिती कोडवर्डच्या भाषेत सॅटेलाईट फोनवरून पाकिस्तानातील आपल्या प्रमुखांना ते पोहोचवत होते. सामान्य बोटींसाठी कोडवर्ड होता 'भाई लोग' तर नौदलाच्या बोटींसाठी कोडवर्ड होता 'यार लोग.' आणि नौदलाच्या मोठ्या बोटींसाठी कोडवर्ड होता 'यार लोगोंका ग्रुप.' प्रवासासाठी कोडवर्ड होता 'बरफ.' तर सर्व काही ठीक आहे हे सांगण्यासाठी कोडवर्ड होता 'मछली लग रही है'अडचण आहे हे कळवण्यासाठी कोडवर्ड होता 'मशीन.' तर मदत मागण्यासाठी कोडवर्ड होता 'माल'अल कुबेर बोटीनं हे दहशतवादी मुंबईच्या जवळ 4 नॉटीकल माईल्सपर्यंत आले. त्यांनी तिथून सॅटेलाईट फोनवरुन पाकिस्तानातील लष्कर ए तय्यबाच्या आपल्या प्रमुखाला फोन केला. तेव्हा त्यांना आदेश मिळाला की अल कुबेरच्या कॅप्टनला ठार मारा. आदेश पाळला गेला. अमरसिंग सोळंकी या कॅप्टनला क्रूरपणे मारण्यात आलं. त्यानंतर हवा भरून वापरता येणार्‍या रबरी बोटीत हे 10 दहशतवादी बसले. पण इथं त्यांनी पहिली चूक केली. ती चूक पाकिस्तानातील लष्कर ए तोयबासाठी घोडचूक तर ठरलीच, पण पाकिस्तानाचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी महत्वाची ठरली. दहशतवादी अल कुबेर बोटीतून रबरी बोटीत बसताना त्यांना नौदलाची बोट जवळ येताना दिसली. घाई घाईत ते रबरी बोटीत बसले पण सॅटेलाईट फोन मात्र अल कुबेरमध्ये विसरले. हीच मोठी चूक त्यांना महागात पडली. लष्कर ए तय्यबाचा हात मुंबई हल्ल्यात आहे हे सिध्द करणारा मोठा पुरावा सॅटेलाईट फोनमुळं मुंबई पोलिसांच्या हातात मिळाला.जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या मदतीनं हे दहशतवादी दक्षिण मुंबईच्या मच्छीमार नगर इथं उतरले. उतरण्या पूर्वी त्यांनी रबरी बोटीच्या इंजिनाचा नंबर खरवडून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही आणि इथं दहशतवाद्यांनी पाकच्या दहशतवादाचा आणखी एक पुरावा मागं सोडला. बोटीच्या इंजिनाचा नंबर होता- सदुसष्ट - सीएल- 1020015. इंजिन होतं जपानच्या यामाहा कंपनीचं. ते पाकिस्तानात इंपोर्ट करण्यात आलं होतं. पाकिस्तानातल्या "बिझिनेस ऍन्ड इंजिनियरिंग ट्रेन्डस् ' या कंपनीनं विकलं होतं. या कंपनीचा पत्ता आहे 24, हबीबुल्लाह रोड, लाहोर. आणि कंपनीचा फोन नंबर आहे - 92 42 63 11044... या इंजिनाशिवाय या बोटीतून मेडिकल कीट, डिझेल ड्रम, कपडे सापडले. या सर्वांवर मार्क होता मेड इन पाकिस्तानया सर्व पुराव्यांवरून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होतो. आता याच पुराव्यांचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघडा करता येऊ शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2009 06:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2009 06:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close