S M L

राणे-सोनिया भेट

10 जानेवारी दिल्लीकाँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी 6.30 वाजता ही भेट होईल. त्यापूर्वी राणे केद्रीय संरक्षण मंत्री ए के अन्टोनी यांना भेटत आहेत. ए के अन्टोनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत. राणे यांना काँग्रेसनं 6 डिसेंबर रोजी पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी राणे यांना काँग्रेसमध्येच राहण्यासाठी मन वळवलं. त्यानंतर राणे यांनी आपण सोनियांना भेटणार असं जाहीर केलं होतं. सोनियांच्या भेटीनंतर राणे यांचं निलंबन रद्द केलं जाईल असं सांगितलं जात आहे. राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल की त्या ऐवजी त्यांच्या दोन समर्थकांना मंत्रिपद दिलं जाईल यावरही लवकरच निर्णय होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2009 12:05 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2009 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close