S M L

वाहतूकदारांचा संप मिटला

11 जानेवारी राज्यात गेले 7 दिवस चालू असलेला वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आला आहे असं वाहतूक आयुक्त संगीतराव यांनी माहिती दिली. रात्रीपासून वाहतूक सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. पण नाशिक आणि पुण्यातल्या वाहतूकदारांचा विरोध कायम आहे. वाहतूक आयुक्त संगीतराव, वाहतूक सचिव दीपक कपूर आणि वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या उपस्थितीत हा संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.मा.मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या आवाहना प्रतिसाद देऊन वाहतूक संघाने हा संप मागे घेतला आहे असं महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सांगितलं.मंदीच्या काळात शेतक-यांना, उद्योजकांना ज्याप्रकारे सवलती दिल्या त्याप्रमाणे वाहतूकदारांनाही द्याव्यात याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्याना दिलं आहे त्याचा विचार होईल अशी माहिती त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 11:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close