S M L

'मराठी तरूणांना अडकवून राज होतात नामानिराळे'

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2013 06:09 PM IST

'मराठी तरूणांना अडकवून राज होतात नामानिराळे'

raj345634362347623

मुंबई 13 जून : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवलीयं. राज ठाकरे मराठी युवकांची माथी भडकावून आंदोलन करून नामानिराळे होतात अशी टीका काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. तर आंदोलन करून त्यानंतर इतरांना त्याचा दोष देणं हीच ठाकरे शैली असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ऑक्टोबर 2008 मध्ये वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना मारहाण केली होती आणि परीक्षा उधळली होती. या प्रकरणी राज ठाकरेंनी बुधवारी कोर्टात खटला रद्द करण्यात यावं असं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यावर माणिकराव ठाकरे आणि नवाब मलिक यांनी टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2013 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close