S M L

सिंधुदुर्गमध्ये हत्तिणीचा मृत्यू

12 जानेवारी, रत्नागिरीदिनेश केळुसकरजंगली हत्तींना जेरबंद करण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये सुरू झालेल्या वनविभागाच्या मोहिमेला पहिल्याच टप्प्यात जबरदस्त हादरा बसला आहे. गुंगी देऊन पकडलेल्या एका हत्तिणीचा दुस-याच दिवशी मृत्यू झाल्यानं वनविभागाला ही मोहीम खंडीत करावी लागली आहे. हा मृत्यू हत्तिणीला झालेल्या अतिसारामुळे झाल्याचं वनविभागानं स्पष्टीकरण दिलं आहे.गेल्या सहा वर्षांपासून सिंधुदुर्गमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांना जेरबंद करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून आसामातल्या प्रशिक्षित हत्तींच्या मदतीने वनविभागाने ही मोहीम सुरू केली. मोहिमेच्या दुसर्‍याच दिवशी एका हत्तीणीला गुंगी देऊन पकडण्यात यशही आलं. दोन प्रशिक्षित हत्तींच्या मदतीनं तिला निवजे गावात माणसाळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र रविवारी दुपारी दीड वाजता या हत्तीणीचा मृत्यू झाला. " तिला कंटीन्यूस डी हायड्रेशन सुरू होतं. वर्मस निघाले होते. त्यात तिला मल्टीपॅरेसितल अटॅक आला. आम्ही 12 ते 15 सलाईन दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, " अशी माहिती सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी दिली. वनविभागाने हत्तींच्या बंदोबस्तासाठी सुरू केलेल्या या मोहिमेत पहिल्याच टप्प्यात अपयश आलं आहे. त्यामुळे उरलेल्या हत्तींना पकडण्यासाठी वनविभागाला काळजावर दगड ठेऊन मोहीम पार पाडावी लागणार आहे. हत्तीणीचा मृत्यू गुंगीच्या औषधाच्या रिऍक्शनमुळे झाला की इतर कारणामुळे ते पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनंतरच कळ्णार आहे. पण अशा प्रकारे गुंगी देऊन पकडण्यात हत्तींचा मृत्यूही होऊ शकतो याची स्पष्ट कल्पना वनविभागाच्या तज्ज्ञांनी सरकारला सहा महिन्यांपूर्वीच दिलेली होती. " अशाप्रकारे हत्ती पकडताना काय काय होऊ शकतं या सर्व बाबींची चर्चा झाली होती. त्यावेळी सगळे मंत्री उपस्थित होते. विधानसभेचे सभापती होते. ही चर्च सहा महिन्यांपूर्वीच झालेली होती, अशी पुस्ती सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी दिली. वनविभागाला अजून पाच हत्तींना गुंगी देऊनच पकडायचं आहे. पण 45 वर्षांच्या या हत्तीणीच्या मृत्यूमुळे पुढची अत्यंत जोखमीची ही प्रक्रिया पार पाडण्यात वनविभागाची आणि पर्यायाने सरकारची कसोटी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 05:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 05:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close