S M L

कर्मचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य-दीपक पारिख

12 जानेवारी हैद्राबादसत्यमच्या नव्या बोर्डाची पत्रकार परिषद हैद्राबादमध्ये झाली. या पत्रकार परिषदेत संचालक मंडळाचे सदस्य दीपक पारिख, किरण कर्णिक आणि सी.अच्युतन उपस्थित होते. कंपनीच्या सद्यस्थितीची विशेषत: आर्थिक परिस्थितीचा तपशील आताच देणं अशक्य असल्याचं यावेळी नवे संचालक दीपक पारिख यांनी सांगितलं. तसंच नवे अध्यक्ष, सीईओ आणि सीएफओ यांची नियुक्ती बोर्डाचे इतर सदस्य ठरल्यानंतरच करण्यात येईल असंही ते म्हणाले. अकाउंट्सची फेरतपासणी करण्यासाठी नवी ऑडिटर फर्मदेखील येत्या दोन दिवसात नेमण्यात येणार आहे. कंपनी फेररचनेचा निर्णय नवी मॅनेजमेंट घेणार आहे. दरम्यान कार्यवाहक सीईओ राम मैनामपती हे नव्या बोर्डात नसतील. कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जात असून थकबाकीचं प्रमाण जास्त असल्याचंही पारिख म्हणाले. पण कर्मचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईलं असं त्यांनी स्पष्ट केलं. या घोटाळयामुळे गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.सत्यमची आर्थिक बाजू सुधारण्यासाठी आता खूप मेहनत करावी लागणार आहे असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 02:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close