S M L

मालवणमध्ये स्नॉर्कलिंग व्यवसाय

13 जानेवारी, मालवाण समीर म्हाडगूतमासेमारी व्यवसायातल्या स्पर्धेत दिवस वाया न घालवता, मालवणमधल्या एका मच्छिमारानं स्वतःचा स्नॉर्कलींग व्यवसाय सुरू केला आहे. पर्यटकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण पर्यटन जिल्हा असूनही या व्यवसायासाठी लागणारी प्राथमिक परवानगीसुध्दा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत नाहीये. सरकारकडून होणा-या अडवणुकीमुळे इथल्या तरुणांच्या उमेदीला मर्यादा पडत आहेत. मालवणच्या रुपेश प्रभू यानं मासेमारीमध्ये अडकून न पडता स्नॉर्कलींग व्यवसायाची वेगळी वाट धरली आहे. तो दररोज सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच्या समुद्रात पर्यटकांना घेऊन जातो. किल्ल्याजवळच्या समुद्रात असणारे वेगवेगळे मासे आणि प्रवाळ पर्यटकांना दाखवतो. रुपेशच्या ग्रुपमध्ये दहा जण गाईड म्हणून काम करतात. पर्यटकांनाही काहीतरी नवीन पाहिल्याचा आनंद मिळतो. "एकदम छान वाटलं वेगवेगळे मासे बघायला मिळाले. कोरल्स बघायला मिळाले. मला माहीत नव्हतं की सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असं काहीतरी असेल. पैसा वसूल, " असं मुंबईचे पर्यटक समीर पराडकर यांचं म्हणणं आहे. पर्यटन व्यवसायात उतरू पाहणा-या स्थानिकांना सरकारी परवानग्या ताबडतोब मिळायला हव्यात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत होऊन अकरा वर्षं झालीयेत. पण याबाबतच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा मुख्यालयात अद्याआप एक स्वतंत्र कक्ष सुध्दा नाहीये. सध्या एमटीडीसी मार्फत तारकर्लीला स्नॉर्कलींग व्यवसाय चालतो. रुपेशला हा व्यवसाय सुरू करताना खूप विरोध झाला. त्यामुळे पर्यटन व्यवसायासाठी लागणा-या किमान आवश्यक परवानग्या जिल्ह्यातच मिळाव्यात अशी त्याची मागणी आहे. "योजना माझ्याकडे आहेत म्हणजे अंडर सी वॉकिंग अंडर सी व्हिडीओग्राफ़ी. असे प्रोजेक्टस माझ्या मनात आहेत.पण यासाठी लागणारे परमिशनस घेण्यासाठी मला मुंबईला किंवा बाकी बरेचसे ऑफ़ीसेसला जावं लागणार आहे. माझी अशी ईच्छा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातच त्या मिळाव्यात, " असं रुपेश प्रभूनं सांगितलं. सध्या असं स्नॉर्कलींग करण्यासाठी एका पर्यटकाला दोनशे पन्नास रुपये खर्च येत असला तरीही समुद्रातली दुनिया बघायला अनेक पर्यटक इच्छुक आहेत. त्यामुळे रुपेशसारखे अनेक तरूण मच्छिमार या व्यवसायात आता उतरू पाहत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2009 06:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2009 06:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close