S M L

सत्यमच्या मदतीला सरकार सरसावलं

13 जानेवारी, नवी दिल्लीसोनल जोशी / अभिजीत नियोगी सत्यमच्या बुडत्या नावेला आधार देण्यासाठी आता खुद्द सरकारच पुढं सरसावलं आहे. सत्यम प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लक्ष घातलं आहे. सीएनएन - आयबीएनला मिळालेल्या विशेष माहितीनुसार यानुसार पंतप्रधानांनी कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर यांना सरकारच्या बाजूनं सत्यम प्रकरणी मदत करण्याची सूचना दिली आहे. पंतप्रधानांनी सेबीचे प्रमुख सी.बी.भावे यांच्याकडून या सर्व घोटाळ्याची माहिती जाणून घेतली. यावेळी अर्थमंत्रालयाचे काही अधिकारीही हजर होते. सत्यमच्या मॅनेजमेंटनं मागणी केल्यास सरकार सत्यमसाठी बेलआऊट पॅकेजचाही विचार करेल असंही पंतप्रधानांनी सांगितल्याचं समजलं आहे. पसरकारतर्फे आय.टी क्षेत्रातल्या तीन दिग्गजांना घेऊन सत्यम्‌चं नवं बोर्ड बनवण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये या नव्या बोर्डाची बैठक झाली. सत्यमचं हे भरकटलेलं तारू सरकारच्या हस्तक्षेपानंतर मार्गाला लागेल, अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. आय.टी आणि फायनान्शिल क्षेत्रामधली तीन अनुभवी आणि दिग्गज माणसं आता सत्यम कॉम्प्युटर्सच्या नव्या आयुष्याची आखणी करणारेत. यात आहेत एचडीएफसीचेअध्यक्ष दीपक पारिख, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कार्णिक आणि सेबीचे माजी सदस्य सी .अच्युतन यांच्यासारखी अर्थक्षेत्रातली जाणकार मंडळी बोर्डावर सदस्य म्हणून आहेत. "आम्हाला लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणारआहेत. त्यानंतर आम्ही कंपनी अकाऊण्टच्या फेररचनेसाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, "असा विश्वास एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारिख यांनी दिला. " कंपनीची विश्वासआर्हता, कर्मचारी आणि गुतवणूक दारांचा विश्वास परत मिळवणं हे आमचं प्रमुख काम आहे. गुंतवणूकदाराच्या हिताच्या दृष्टीनंही आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत, " असं कंपनी व्यवहार मंत्री पी.सी.गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.आय.टी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी या नव्या मंडळाचं स्वागत केलंय. सत्यमच्या इतर मॅनेजमेंटमध्ये बदल करण्याविषयी हे नवे संचालक निर्णय घेतील. सत्यमला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची गेलेली पत पुन्हा मिळवून देणं, बिझनेस वाढवून कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणं आणि ग्राहक तसंच कर्मचार्‍यांना कंपनी सोडून जाण्यापासून रोखणं अशी काही मोठी आव्हानं या नव्या बोर्डासमोर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2009 07:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2009 07:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close