S M L

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2013 11:22 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव

bhaskar jadhavमुंबई 15 जून : मुलामुलीच्या शाही लग्न सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी ओढावून घेणार्‍या भास्कर जाधव यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय.राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादीत एक नवं पद तयार करण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवडण्यात आलंय. यानिमित्ताने राष्ट्रवादीला तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच पवारांनी 6 नेत्यांचं एक सल्लागार मंडळ स्थापन केलंय. हे मंडळ अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना सल्ला देण्याचं काम करेल.

आयबीएन-लोकमतशी बोलताना काही महिन्यांपूर्वी पवारांनी भास्कर जाधव यांनी मुलाच्या लग्नात केलेल्या उधळपट्टीवर टीका केली होती. या घटनेमुळे आपल्याला रात्रभर झोप लागली नसल्याचं ते म्हणाले होते. आता त्याच पवारांनी जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केलीय.

तसंच पवारांनी 14 नेत्यांचं एक सल्लागार मंडळ स्थापन केलंय. हे मंडळ अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना सल्ला देण्याचं काम करेल. काही दिवसांपुर्वी मंत्रिमंडळात खांदेपालट झाला होता, तेव्हा अजित पवारांच्या निकटवर्तीयांना झुकतं माप मिळालं होतं. पण आता संघटनात्मक पातळीवर मात्र शरद पवारांचाच वरचष्मा आहे, हे या दोन्ही निवडींमुळे अधोरेखित झालंय.

या निवडीमागे राष्ट्रवादीची रणनीती काय आहे ?

- फडणवीस, राज, उद्धव या विरोधकांच्या तरुण चेहर्‍याला राष्ट्रवादीचं तरुण उत्तर

- जाधव, आव्हाड हे दोघेही आक्रमक; आरोपांना सडेतोड उत्तरं देतील

- प्रदेशाध्यक्ष मराठा आणि कार्याध्यक्ष वंझारी समाजातले करून जातीय समीकरण सांभाळलं

- आव्हाडांमुळे मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समाजात राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता

- मुंबई, ठाणे, कोकण मिळून विधासभेच्या 100, लोकसभेच्या 9 जागांमध्ये फायदा होण्याची शक्यता

- राष्ट्रवादीला कोकणात वाढण्याची संधी, म्हणून राणेंविरोधात जाधवांना बळ मिळेल

- शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणार्‍या नेत्यांसाठी भास्कर जाधव सोयीचे

'आरोपांमुळे अस्वस्थ होऊ नका,काम करत राहा'

आरोप आणि तक्रारींमुळे अस्वस्थ होऊ नका, कामे करीत राहा या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण केली. शुक्रवारी नाशिकमधल्या उड्डाणपुलाचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्यावरही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप विरोधी पक्ष करीत होते, मात्र त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी पुढे त्यात तथ्य नसल्याचं सांगितल्याची आठवण त्यांनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2013 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close