S M L

दुष्काळग्रस्तांना दिलासा, हतनूर धरणं पूर्ण भरलं

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2013 11:13 PM IST

दुष्काळग्रस्तांना दिलासा, हतनूर धरणं पूर्ण भरलं

hatnur damजळगाव 15 जून : दुष्काळग्रस्त खान्देशातल्या लोकांसाठी आनंदाची बातमी...जळगाव जिल्हातल्या भुसावळ तालुक्यातलं हतनूर धरण आज पूर्ण भरलं. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. याच भागात आधी दुष्काळ पडला होता.

पण आता इथं मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तापी नदीला पुराचा धोका निर्माण झालाय. पूर नियंत्रणासाठी धरणाचे 41 पैकी 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत 1लाख 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झालाय.

धरणालगतच्या गावांना विसर्ग झालेल्या पाण्याचा धोका नाही असं अधिकार्‍यांनी स्पष्ट केलंय. याच धरणाने गेल्या महिन्यात तळ गाठला होता. राज्यात इतरत्रही पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात समाधानकारक पाऊस पडतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2013 11:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close