S M L

एनएसजी कमांडोजचं उत्स्फूर्त स्वागत

13 जानेवारी, मुंबईअजित मांढरेनरीमन हाऊसवरच्या हल्ल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी आज एनएसजीच्या टीमनं नरीमन हाऊसची पाहणी केली. नरीमन हाऊसमधल्या प्रत्येक मजल्याची ते तपासणी करताहेत. तसंच अतिरेक्यांच्या प्लॅनिंगचाही ते तपास करणार आहेत. यावेळी त्यांच्या कामगिरीचं कौतुक करत, आजूबाजूच्या इमारतीत राहणार्‍यांनी मिठाई वाटून त्यांचं स्वागत केलं.मुंबईवर 26/11ला दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळी दहशतवाद्यांनी सीएसटी, ताज,ऑबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊसवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात नरिमन हाऊसचं मोठं नुकसान झालं. एनएसजी कमांडो मोर्चा सांभाळून नरीमन हाऊसमधील दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. या ऑपरेशन दरम्यान गजेंद्रसिंग नावाचा कमांडो शहीद झाला होता. त्यावेळी एनएसजी कमांडोनं कशाप्रकारे धडक कारवाई केली त्याची पाहणी एनएसजीचे जनरल ए.के.शर्मा यांनी केली.या हल्ल्यात कमांडोंबरोबरच स्थानिकही जखमी झाले होते. यादरम्यान स्थानिकांना कमांडोजना अनेकप्रकारे मदत केली होती. ती बाब लक्षात घेऊन एनएसजी कमांडोचे जनरल शर्मा यांनी स्थानिकांना मिठाई वाटप केलं.कडक शिस्तीचे कठोर मनाचे असे एनएसजी कमांडोंच हळव रुप सगळ्यांसमोर आलंय. स्थनिकांचे कमांडोनी आभार मानलेयातच त्यांचा मोठेपणा स्पष्ट होतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2009 02:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2009 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close