S M L

पाकशी व्यापारी संबंध तोडण्याचा इशारा

13 जानेवारीमुंबई हल्ल्याच्या तपासात पाकिस्ताननं सहकार्य केलं नाही तर पाकिस्तानबरोबरचे व्यापारी संबंध तोडू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिला आहे. टाईम्स ऑफ लंडन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनी भारतानं दिलेले पुरावे ही फक्त माहिती आहे, असं पाकिस्ताननं म्हटलंय. त्यामुळे चिदंबरम यांनी हा इशारा दिलाय. व्यापार, पर्यटन, दळणवळण यासारख्या गोष्टींवर पाकिस्तान मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे दहशतवाद्यांवर पाकिस्ताननं कारवाई केली नाही तर पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध हळूहळू संपवण्यात येतील, असा इशारा चिदंबरम यांनी दिलाय. तसंच भारतानं पाकिस्तानला पुरावे सोपवल्यानंतर पाकिस्ताननं त्यावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी माहितीही त्यांनी या मुलाखतीत दिलीय.भारतानं दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्ताननं कोणतीच हालचाल केली नसल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय. पण पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पुन्हा एकदा पुरावे फेटाळलेत. हे पुरावे नसून केवळ माहिती असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. " भारतानं आमच्याकडं जे काही दिलंय, ती केवळ माहिती आहे, पुरावे नाहीत. त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे." असं ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2009 05:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2009 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close