S M L

हवाई दलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

14 जानेवारी'भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता पाकिस्तानपेक्षा कमी आहे. ती कार्यक्षमता वाढवली नाही तर हवाई युद्ध महागात पडेल'... हा इशारा दिलाय हवाईदलाच्या माजी प्रमुखांनीच. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच सरकारला हा इशारा दिला होता. पण आजही स्थिती जैसे थेच आहे. सध्या भारत-पाकिस्तानमधला तणाव वाढत चाललाय. युद्ध झालंच तर पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताकडे सर्वोत्तम दर्जाची लढाऊ विमानंही नाहीत. भारतीय हवाई दलाची झेप तर मोठी आहे, पण विमानं कमी. सद्यस्थितीत आणखी 39 विमानांची गरज असताना फक्त 32 विमानांनाच मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात या सगळ्या त्रुटी लिहिण्यात आल्यायत. 2006 मध्ये पाठवलेल्या या पत्राला सीएनएन आयबीएननं प्रथम प्रसिद्धी दिली. माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांनी सरकारला पाठवलेल्या या पत्रात स्पष्ट म्हटलंय की. जर हवाई दलाची स्थिती सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलली नाही, तर पाकिस्तानसोबतच्या युद्धात हार होईल.मोठ्या युद्धाचा सामना करण्यासाठी सध्या भारताकडे असलेली लढाऊ विमानांची संख्या अपुरी आहे. भारताकडे असलेली सध्याची लढाऊ विमानंसुद्धा सर्वोत्तम क्षमतेची नाहीत. मिग 27 चं आधुनिकीकरण होतंय. मिग 29 च्या आधुनिकीकरणासाठीचं डील झालंय. पण ते पूर्ण व्हायला अजून 3 वर्ष लागतील. मिराज 2000चं सुद्धा आधुनिकीकरण बाकी आहे.या अपुर्‍या विमानांनिशीही भारतीय हवाई दल पाकिस्तानशी सामना करेल. पण युद्धात महत्त्वाची भूमिका बजावायची वेळ आली, तर हवाई दलाला छाटलेल्या पंखानिशीच पाकिस्तानी विमानांना टक्कर द्यावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 09:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close