S M L

कैफियत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची

14 जानेवारी, औरंगाबादमाधव सावरगावेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी हा 16 वा नामांतर दिन. नामांतरानंतर विद्यापीठात अनेक नवे विभाग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. पण विद्यापीठातल्या अधिकार्‍यांची, कर्मचा-यांची मानसिकता बदलली नाही. त्यामुळचं बाबासाहेबांना अपेक्षित असा विद्यार्थी घडवला जात नाही, असं विद्यार्थ्यांना आजही मनोमन वाटतं आहे. 14 जानेवारी 1993 रोजी मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर झालं. यासाठी सलग 18 वषंर् लढा दिला गेला. या विद्यापीठातून बाबासाहेबांना अपेक्षित असा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षा होती. पण, त्यासाठी विद्यापीठ फारसं बदललं नाही. " केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळायला हवा होता, " असं संशोधक तुकाराम सराफ यांचं म्हणणं आहे. मानसिकता बदलली नाही. शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी, ही खंत राम बारकुले या विद्यार्थ्याची आहे.नामांतरानंतर 16 नवे विभाग सुरू झाले. यातून विद्यापीठाचा विकास झाल्याचं कुलगुरुंचं म्हणणं आहे. " नामविस्तार झाल्यानंतर या विद्यापीठाचा भौतिक आणि शैक्षणिक विकास झाला आहे, असं विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले. नामविस्तारानंतर विद्यापीठाला अनेकदा निधी मिळाला आहे. त्यातून नव्या पायाभूत सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न झाला. पण तो मात्र अयशस्वी झाला. त्यासाठी आंदोलनं करावं लागतं आहे. " मराठा विद्यापीठ सोयीसुविधांनी इतकं युक्त आहे की ते पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्याही पुढे जाऊ शकतं, " असं मनोज टाक या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. विद्यापीठात 40 विभाग कायर्रत आहेत. प्रत्येक ठिकाणी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीयेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 09:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close