S M L

IBN लोकमतचा दणका :आदिवासी वसतीगृहाचा जीआर रद्द

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2013 10:55 PM IST

IBN लोकमतचा दणका :आदिवासी वसतीगृहाचा जीआर रद्द

नाशिक 18 जून : आदिवासी वसतीगृहाच्या जीआरची बातमी आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने जाचक अटी काढणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केली. आदिवासी वसतीगृहात प्रवेश देण्यासाठीच्या जाचक अटी त्वरित रद्द करणार असल्याचं पिचड यांनी म्हटलं आहे.

 

विद्यार्थ्यांच्या हक्कांचं उल्लंघन करणार्‍या या अटींमुळे शिक्षण हक्क कायद्याचंही उल्लंघन होत असल्याचं मत पिचड यांनी व्यक्त केलं. माध्यमांकडे तक्रारी करू नका, आंदोलने, मोर्चे काढू नका, जास्तीचं जेवण मागू नका अशा जाचक अटी वस्तीगृहातल्या प्रवेशासाठी आदिवासी विकास खात्यानं घातल्याचं आयबीएन - लोकमतनं उघडकीला आणलं होतं.

 

10 एप्रिलला आदिवासी विकास खात्यानं आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना यात काही अटी घालण्यात आल्या होत्या. अखेर प्रशासनाने अटी काढल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2013 10:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close