S M L

जमातवर पाकिस्तानची कारवाई

15 जानेवारीमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य देण्याची पाकिस्तननं घोषणा केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी ही घोषणा केली आहे. याचबरोबर युनोच्या निर्देशांनुसार पाकिस्ताननं जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या संघटनेच्या 124 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे. यात जमात चा म्होरक्या हाफीज मोहम्मद सईद याचाही समावेश आहे."मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आम्ही भारताच्या दु:खात सहभागी आहे. या हल्ल्याबद्दल वारंवार पाकिस्तानवर आरोप करण्यात येत आहेत. मात्र या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तान भारताला पूर्ण सहकार्य करेल. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि तशी कारवाईदेखील करत आहोत" असं रेहमान मलिक म्हणाले.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीर-उर-लखवी यालाही अटक केल्याची माहिती रेहमान मलिक यांनी दिली. जमात चे पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधले पाच कॅम्प बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली. 26/11 च्या तपासासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. याचवेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या तपासासाठी भारत-पाक संयुक्त चौकशी समिती नेमण्याची मागणीही त्यांनी केली.भारतानं वारंवार मागणी करूनही पाकिस्ताननं आत्तापर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई केली नव्हती. अगदी आत्ता आत्तापर्यंत जमात चे झेंडे लाहोरमध्ये दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान सरकारवरआंतरराष्ट्रीय दबावही वाढत होता. ही कारवाई करून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपली प्रतिमा उजळण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 09:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close