S M L

बेळगावातील आंदोलनाला महाराष्ट्र भाजपचा पाठिंबा

15 जानेवारी नागपूरमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी महाराष्ट्र भाजपनं मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटकमध्ये जरी भाजपचं सरकार असलं तरी, महाराष्ट्र भाजपचा पाठिंबा मराठी माणसांलाच असेल असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. गडकरी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या बाजूने आहोत. कर्नाटकची कृती योग्य नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा संघर्ष निर्माण होईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील मराठी माणसांच्या बाजूने उभे राहू असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.बेळगावात होणा-या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. तसंच एकीकरण समितीच्या 5 नेत्यांना अटक केली आहे. आणि इतर 150 सदस्यांना अटक करण्यासाठी धाडसत्र सुरू केलं आहे. या घटनाक्रमावर नितीन गडकरी यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 10:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close