S M L

यात्रेकरूंच्या नातेवाईकांना अजितदादांनी ठेवलं ताटकळत

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2013 09:39 PM IST

यात्रेकरूंच्या नातेवाईकांना अजितदादांनी ठेवलं ताटकळत

ajit pawarपुणे 24 जून : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या लोकांनी सुखरूप परतावं यासाठी सध्या त्यांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे. यासाठीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये आले होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु असल्यानं हे सगळेजण बराचवेळ तिथं थांबले.

अजित पवारांनी वेळ दिलीय, त्यामुळे आपल्याला त्यांना भेट घेऊ द्यावी, अशी या लोकांनी मागणी केली. पण, जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून अजित पवार नातेवाईकांना न भेटताच निघून गेले. त्यामुळे हे सगळेजण संतापले. शेवटी अजित पवारांनी साखर संकुलात या नातेवाईकांना बोलावून घेऊन त्यांची भेट घेतली. मात्र अजित पवारांच्या 'बिझी शेड्युल'मुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2013 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close