S M L

मंजुरी नसलेल्या कामाचं शरद पवारांकडून उद्‌घाटन !

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 05:20 PM IST

मंजुरी नसलेल्या कामाचं शरद पवारांकडून उद्‌घाटन !

sharad pawar44ठाणे 24 जून : केंद्रीय कृषमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी ठाण्यातल्या कळवा भागात काही विकासकामांचं उद्‌घाटन केलं होतं. पण, या बांधकामांना ठाणे महापालिकेची मंजुरीच नव्हती अशी धक्कादायक बाब आता उघड झालीय. या कामांची बिलं जेव्हा महापालिकेत मंजुरीसाठी आली तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले.

गेल्या महिन्यात शरद पवार यांच्या हस्ते मुंब्रा कळवा या ठिकाणी विविध कामाच उद्‌घाटन करण्यात आलं. 25 लाख रुपयांच्या वर काम सुरु करायची असल्यास त्याला महासभेची तसंच आयुक्तांची परवानगी घ्यावी लागतेय. पण ही कामं महापालिकेच्या रेकॉर्डवर नाहीत. आता ही सर्व बिलं पालिकेसमोर ठेवण्यात आलीय. या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केलीय.

आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियम पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारामुळे नवी पद्धत रुढ होईल. त्यामुळे या सर्व दोषी अधिकारा़यंावर कारवाई व्हावी अशी मागणी होतेय. या प्रकाराबद्दल काहीही माहिती नाही असं विरोधीपक्ष नेते सांगत असले तरी पालिका प्रशासन ही सर्व बिलं मंजूर करण्याचा घाट घालत आहे.

या सर्व कामांच उद्‌घाटन करताना स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपध्दतीच पवारांनी कौतूकही केलं होतं. आव्हाडांची हीच कार्यपध्दतीच पवारांनी कौतूक केलं की काय अशी चर्चा होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2013 10:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close