S M L

फ्रायडे रिलीज

15 जानेवारी, मुंबई' गजनी ' नंतर कोणताही मोठा हिंदी सिनेमा रिलीज झाला नव्हता. त्यामुळे सगळीकडे चर्चा होती ती फक्त गजनीची. गजनीनं बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडले. पण आता गजनीला चॅलेन्ज द्यायला येतोय, अक्षय कुमारचा ' चांदनी चौक टू चायना '. त्याच्याबरोबर इंग्लिश सिनेमा ' चेंजलिंग 'ही रिलीज होतो आहे. ' चांदनी चौक टु चायना ' म्हणजे धमाल कॉमेडी आणि ऍक्शन. अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोणची यांची जोडी पहिल्यांदाच बघायला मिळेल. अक्षयने दिल्लीच्या चांदनी चौकमध्ये राहणार्‍या सिद्धूची भूमिका साकारली आहे. या सिद्धूला एक ज्योतिषी सांगतो की गेल्या जन्मी तू चीनचा राजा होतास, आणि मग सिद्धूचा प्रवास सुरू होतो चांदनी चौक ते शांघायपर्यंत. या प्रवासात बर्‍याच गमतीजमती घडतात. दीपिकाचा यात डबल रोल आहे. निखिल अडवाणीचं दिग्दर्शन आहे. मिथुन चक्रबर्ती, रणवीर शौरी यांच्याही भूमिका आहेत. सिनेमातल्या सिद्धूने चीनपर्यंत झेप घेतली. हा सिने बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा किती मजल मारतोय ते पहायचं आहे. चेंजलिंग हा हॉलिवूडचा सिनेमा रिलिज होता आहे . एका आईचा मुलगा हरवतो आणि मग तिचा शोध सुरू होतो. एक दिवस एक अनोळखी मुलगा येऊन आपणच तिचा मुलगा असल्याचं सांगतो. ती आई त्या मुलाला घरी ठेवून घेते, पण आपल्या खर्‍या मुलाचा तिचा शोध काही संपत नाही. ही चेंजलिंगची कथा आहे. सिनेमाचं दिग्दर्शन क्लिंट इस्टवूड यांचं आहे. सिनेमात एंजलिना ज्युलीची मुख्य भूमिका आहे. भावनिक नाट्य, गुन्हेगारी सर्व गोष्टी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाला या वर्षीची दोन गोल्डन ग्लोब नॉमिनेशन्स मिळाली होती.या वीकेण्डला जास्त सिनेमे रिलीज होत नसले, तरी मोठे सिनेमे रिलीज होतायत. आता हॉलिवूड की बॉलिवूड, चॉईस तुमचा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 12:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close