S M L

पुण्यासाठी स्वतंत्र महानगर प्राधिकरण

15 जानेवारी, मुंबईआशिष जाधवमुंबईच्या एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठी स्वतंत्र महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए होणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. "संपूर्ण शहराच्या इंटिग्रेटेड विकासासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात सदस्यांशी चर्चा केली जाई. संपूर्ण सर्व्हे केला जाईल. आणि यानंतर रस्ते, पाणी, रेल्वे असा सर्व प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन केलं जाईल. त्यासाठी घटनात्मक दुरुस्तीही करण्यात येईल." असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. पाणीपुरवठा, रस्ते, घरं, वाहतूक यासाठी खास प्रकल्प यात राबवण्यात येणार असून त्यासाठी आर्थिक नियोजनही केलं जाईल.मुंबई, पुणे आणि नाशिक या भागाचं सर्वाधिक शहरीकरण झालं आहे. याच भागात सर्वाधिक उद्योगधंदेही आहेत. त्यामुळेच या भागाच्या सर्वंकष विकासासाठी पीएमआरडीएची स्थापना होणार आहे. खोपोलीच्या पुढचा भाग आता पीएमआरडीएच्या क्षेत्रात येईल. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आणि तळेगाव, आळंदी आणि लोणावळा या नगरपालिकांसह 197 गावं एकत्रीतपणे पीएमआरडीएच्या अधिपत्याखाली येतील. साधारण 3000 किलोमीटरच्या या परिसरातील सर्व नागरिकांना या निर्णयाचा लाभ होईल. येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 02:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close