S M L

भारतीय सैन्यातील युद्धसामुग्री कालबाह्य

15 जानेवारी भारतीय सैन्यदलाबद्दल आपण नेहमीच गौरवानं बोलतो. पण हवाई हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्याची यंत्रणा अपुरी असल्याचं आता उघड झालंय. या यंत्रणेतली 97 टक्के साधनं ही निकामी झाली आहेत. आणि त्याहीपेक्षा धक्क्याची बाब म्हणजे सरकारला याची पूर्णपणे जाणीव आहे. पण तरीही सरकार काहीच पावलं उचलत नाही. पण आपल्या राजकारण्यांनी स्वतःच्या निष्क्रियतेबद्दल लाज बाळगावी अशी परिस्थिती सध्या इंडियन आर्मीची आहे. हवाई दलाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलंय की भारताची हवाई संरक्षण यंत्रणा कमकुवत आहे. हवाई हल्याला तोंड देण्यासाठीची 97 टक्के युद्ध सामुग्री ही निकामी झाली आहे. तरीही सरकारला कोणतीही फिकीर नाही. माजी जनरल व्ही पी मलिक यांच्यामते आपल्याकडची काही युद्धसामुग्री तर दुस-या महायुद्धाच्या काळातली आहे. हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी युद्धसामुग्री आहे ती कालबाह्य झालीय. आर्मीजवळच्या काही शस्त्रांस्त्रांचं आधुनिकीकरण झालंय. पण बरीचशी शस्त्र 2010 पर्यंत निकामी होतील. विमानवेधी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेला क्वाड्रट हा रणगाडा 30 वर्ष आर्मीच्या सेवेत आहे. खरं तर दोन वर्षांपूर्वीच त्याची क्षमता संपली आहे. एल 70 ही विमानवेधी तोफ आर्मीचा भात्यातील प्रमुख अस्त्र. पण ती गेल्या 44 वर्षांपासून वापरात आहे. शिल्का ही स्वयंचलित विमानवेधी तोफ गेल्या 34 वर्षांपासून वापरात आहे अशी अनेक सामुग्री कालबाह्य आहे.माजी डायरेक्टर जनरल, लेफ्टनंट जनरल प्रसाद सांगतात, आम्हाला अत्याधुनिक यंत्रणा आणायची आहे. पण दुदैर्वाने डीआरडीओनं त्याच्यात खीळ घातली. आर्मीच्या मते त्रिशूल किंवा आकाश ही क्षेपणास्त्र तितकीशी प्रभावी नाही. भारतातल्या प्रमुख शहरांना हवाई हल्ल्याची सगळ्यात जास्त भीती असताना आर्मीला मात्र 30 वर्ष जुन्या शस्त्रास्त्रांनीच शत्रूचा सामना करावा लागेल असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 05:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close