S M L

धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2013 10:17 PM IST

धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट

26 जून : भर पावसाळ्यात धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट कायमच आहे. धुळ्यात तब्बल 6 दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होणार आहे. नकाणे तलाव आणि तापी जलपुरवठा योजनेतून शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मधल्या काळात तापीतून सोडण्यात आलेलं पाणी आणि तुलनेनं झालेला कमी पाऊस यामुळे पाण्याच्या पातळीत फारशी वाढ नाही.

आतापर्यंत धुळेकरांना दोन दिवसांनंनतर पाणी येत होतं आता ही पाणी कपात 6 दिवस असणार आहे. तापी नदीवर सुलवाडे येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजचे दरावाजे पावसाळ्यात खुले करण्यात येतात. त्यामुळे या बॅरेजचा साठा संपलाय. शहराला लागणार्‍या 240 क्युसेक्स पाण्याची गरज भागवण्यासाठी आता नकाणे तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतोय. पण नकाने तलावात देखील पाणी नसल्यानं एक आठवड्यानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2013 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close