S M L

दोन माओवादी नेत्यांना सश्रम कारावासाची शिक्षा

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2013 10:37 PM IST

दोन माओवादी नेत्यांना सश्रम कारावासाची शिक्षा

mawo wadi 34543मुंबई 26 जून : दहशतवादी कृत्य करण्याच्या हेतूनं शस्त्रे आणि स्फोटकं बाळगल्या प्रकरणात नागपूरच्या सेशन्स कोर्टाने दोन माओवादी नेत्यांना वेगवेगळ्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर आणखी एका महिला माओवादी महिला महिला नेत्याची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. नक्षलवादी कारवायांमध्ये कुण्या माओवाद्यांना शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

मुंबईतल्या गोवंडी चाळ देवनार येथे राहणारा श्रीधर कृष्णन श्रीनिवासन ऊर्फ विष्णू याला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार 6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तर स्फोटक कायद्याच्या अन्वये श्रीधर याला पाच वर्षे कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यात आली तेव्हा केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेचा राज्य सचिव आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य होता. वर्णन हाही राज्य सचिव होता.

नक्षलवादी कारवायांमध्ये कुण्या माओवाद्यांंना शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मुंबईत एटीएसने 31 ऑगस्ट 2007 रोजी गोवंडी चाळीतील एका खोलीत नक्षलवादी येत जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून एटीएसने श्रीधर वर्णन, गजराला सरय्या ऊर्फ आझाद, मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ दीपक, इसकारा ऊर्फ अंजला हरिश सोनटक्के ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे हे लोक एकत्र येत असून मुंबईवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याच काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2013 10:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close