S M L

मोदींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2013 11:44 PM IST

मोदींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

modi thakare bhet

27 जून  : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर मोदी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव आणि मोदी यांची 15 मिनिटं चर्चा झाली.

यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह सेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते हजर होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये जाऊन केलेल्या मदतीवर सेनेनं सामनाच्या अग्रेलखातून टीका केली होती. मात्र त्याच दिवशी दुपारी खुद्द उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली होती. मोदींनी प्रचार प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदा मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडून आली.

 

मोदींवर अगोदर टीका

“देश मोठा आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची नियुक्ती आता राष्ट्रीय कार्यासाठी झाली आहे. मोदी यांनी उत्तराखंडात

जाऊन गुजराती भाविकांना वाचविले असे सांगणे बरोबर नाही. या कामाबद्दल गुजरात सरकार व मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच. पण देशाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड होत असताना मोदी यांनी फक्त गुजरात एके गुजरात करावे व आपण फक्त गुजरात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाचा विचार करतो अशी भूमिका घ्यावी हे मारक आहे. आपत्तीच्या प्रसंगी संकुचित किंवा प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय विचार करणे आवश्यक आहे.

नंतर शिवसेनेची सारवासारव

आम्ही नरेंद्र मोदींवर टीका केली नाही, ज्या बातम्या आल्या त्यावर आम्ही नाराजी व्यक्त केली. पण नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय पातळीवर दमदार पर्दापण केलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी उत्तराखंडमध्ये जाऊन गुजराथी लोकांना वाचवलं. गुजराथी लोक हे हिंदूच आहे. मोदींनी केलेली मदत योग्यही आहे. जर इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असतं तर ते अधिक योग्य असतं.

Photo by- प्रभाकर वराडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2013 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close