S M L

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनेचा उडाला बोजवारा

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2013 10:57 PM IST

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनेचा उडाला बोजवारा

vavstapan28 जून : उत्तराखंडातल्या प्रलयानंतर आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा बनलाय. उत्तराखंडासाठी मदत पाठवणार्‍या महाराष्ट्रात मात्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा बोजवारा उडालाय. राज्यातल्या 40 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांना गेल्या दोन महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम मार्चमध्ये संपला आहे. त्याच्या मुदतवाढीचे प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच सर्व जिल्ह्यांमधून राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेत. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सही न झाल्यानं त्याला मान्यता न मिळाल्याचं कळतंय. जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचं काम प्रत्यक्षात अमलात आणण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांची होती. मात्र आता ही सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे.

आपत्तीव्यवस्थापनचं आपत्तीत

- कार्यक्रमास मुदतवाढ नाही

- 40 अधिकारी विनापगारी

- शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही

- पुनर्वसन मंत्र्यांचे फक्त आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2013 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close