S M L

भटके कुत्रे करणार मुंबईचं संरक्षण

16 जानेवारी, मुंबईप्राची जतानिया रस्त्यांवरचे कुत्रे आता मुंबईचे रक्षण करणार आहेत. ही चेष्टा नाही. ही बातमी आता खरी होणार आहे. कारण 'बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स' म्हणजेच बीएसपीसीए ही संस्था आता भटक्या कुत्र्यांना प्रशिक्षण देणार आहे. संस्थेच्या हास्पिटलमध्ये सध्या 300 कुत्रे आहेत. पहिल्या टप्प्यात यातल्या बारा कुत्र्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. पण या ट्रेनिंगपूर्वी या कुत्र्यांना कठोर परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. "यासाठी पहिल्यांदा कुत्र्यांची एक परीक्षा घेण्याची गरज आहे.या प्रकारच्या कामासाठी ही कुत्री कितपत उपयोगी आहेत हे बघणं आवश्यक आहे." असं बीएसपीसीएचे सेक्रेटरी कर्नल जी. एस. खन्ना यांनी सांगितलं.संस्थेनं यासाठी मुंबई महापालिकेकडं प्रस्तावही पाठवलाय. यात मनुष्यबळ आणि निधीची मागणी करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटक पथकातल्या कुत्र्यांप्रमाणं या कुत्र्यांना स्फोटकांचा शोध घ्यायला शिकवलं जाणार आहे. या कुत्र्यांना शारीरिक कसरती शिकवल्या जातील. त्यानंतर त्यांना सुरक्षा पथकामध्ये सामील करून घेतलं जाईल. "ही भटकी कुत्री हॉस्पिटल्सच्या सुरक्षेसाठी,पाणी वाटप प्रकल्पासाठी आणि इतर महत्वाच्या कामासाठी उपयोगात येतील." असं आरोग्य उपाधिकारी डॉ. जी. टी. आंबे यांनी सांगितलं.रस्त्यावरच्या कुत्र्यांचा असा आगळा उपयोग करण्याचा हा उपक्रम सध्या तरी कागदावरच आहे. पण ही योजना प्रत्यक्षात उतरेल तेव्हा 'हर कुत्ते का दिन आता है' ही हिंदीतली म्हण मंुबईकरांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2009 01:23 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2009 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close