S M L

जन्मदात्यानेच गरोदर मुलीचा घोटला गळा

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2013 11:16 PM IST

जन्मदात्यानेच गरोदर मुलीचा घोटला गळा

nasik murderनाशिक 28 जून : पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी...खोट्या प्रतिष्ठेसाठी वडलांनीच मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून केलाय. एकनाथ कुंभारकर असं या आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली असून त्याच्यावर 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

प्रमिला दीपक कांबळे हिने आंतरजातीय विवाह केला होता. ती नऊ महिन्यांची गरोदरही होती. पण, तिनं आंतरजातीय लग्न केल्याचा राग वडलांच्या मनात घर करुन होता. त्यांनी तिच्या खुनाचा कट रचला. तिला माहेरी घेऊन येण्यासाठी ते आज सकाळी तिच्या घरी गेले.

आपल्या मनात सुरु असलेल्या या क्रूर कपटाची कल्पना त्यांनी मुलीला येऊ दिली नाही. आपल्यासोबत रिक्षा ड्रायव्हर असलेल्या मित्रालाही एकनाथ कुंभारकर यांनी बोलावून घेतलं होतं. या रिक्षातूनच ती वडिलांसोबत अतिशय विश्वासाने माहेरी येण्यासाठी निघाली होती. पण, गंगापूर रोडवर रिक्षामध्येच वडलांनी दोरीने गळा दाबून प्रमिलाचा खून केला. त्याआधी त्यांनी मित्राला रिक्षा थांबवायला सांगितली. त्यामुळे रिक्षाचालकानेच हा प्रकार बघून पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2013 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close