S M L

कसाबला कुठे ठेवायचं?

16 जानेवारी, मुंबईतोरल वारिया जीवाची बाजी लावून मुंबई पोलिसांनी 26 नोव्हेंबरला हल्ला करणा-या दहशतवाद्यांपैकी एकाला म्हणजेच अजमल कसाबला जिवंत पकडलं. त्यामुळेच पाकिस्तानच्या विरोधातला एक महत्त्वाचा पुरावा भारताच्या हाती सापडला. पण आता या कसाबला सुरक्षित ठेवण्याची मोठीच जबाबदारी मुंबई पोलिसांवर येऊन पडली आहे.त्यामुळे मुंबई पोलीस सध्या मोठया अडचणीत सापडले आहेत. गेल्या 50 दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अजमल कसाबला आता आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. त्याच्या सुनावणीसाठी जेलच्या आवारातच स्पेशल कोर्ट तयार करण्यात येणार आहे. याच जेलमध्ये यापूर्वीच टाडा आरोपींच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट तयार केलं गेलं होतं. सध्या कसाबला कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. फक्त 4 स्पेशल ऑफिसर्सना कसाबच्या कोठडीत जाता येतं. कसाबची चौकशी करणा-या अधिका-यांनाही कोठडीत जाताना मोबाईल बाहेर ठेवायला सांगितलं जातं. त्याच्या चौकशीसाठी येणा-या एफबीआय, स्कॉटलंड यार्डच्या ऑफिसर्सचीही तपासणी केली जाते. तसंच कसाबला देण्यात येणा-या जेवणाचीही कसून तपासणी करण्यात येते. रोज वेगवेगळे अधिकारी कसाबचं जेवण तपासतात. हे जेवणही वेगवेगळ्या ठिकाणांहून मागवलं जातं. कसाबच्या कोठडीत 2 सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.आर्थर रोड जेलमध्ये कसाबला अंडासेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींप्रमाणंच कसाबला आर्थर रोड जेलमधल्या 'अंडासेल'च्या कडक सुरक्षेत ठेवण्यात येणार आहे. सध्या या जेलमध्ये 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी , छोटा राजन, दाऊदचे साथीदार तसंच गँगस्टर अबू सालेम, डी.के राव यांनाही या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण हे आरोपी याच कोठडीत असल्याने कसाबला धोका आहे. सद्या या जेलमध्ये 16 'अंडा सेल' आहेत. अंडासेलमध्ये टॉयलेट आणि पाण्याची सोय असते. कैद्याला जेवणही या कोठडीतच दिलं जातं.पोलिसांनी कसाबला आर्थर रोड जेलमध्ये हलवलं तर कोर्ट ते जेल असे कसाबला फेरे मारावे लागणार नाहीत. आणि त्याच्यासोबत होणारी पोलिसांची धावपळही वाचेल. फक्त स्पेशल पासधारकांनाच कसाबच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याची परवानगी दिली जाणार आहे.कसाबला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण कसाबच्या सुरक्षेचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2009 03:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2009 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close