S M L

राम कदम-क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2013 09:01 PM IST

Image img_236172_ramkadanandthakur43523_240x180.jpg29 जून : विधानभवनाच्या आवारात एपीआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. त्यांच्याशिवाय आणखी 13 अज्ञात लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय.

मुंबईच्या अतिरीक्त न्यायदंडाधिकार्‍यांच्या कोर्टात हे 130 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. यावर 30 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सरकारी नोकराला मारहाण करणं, गुन्हेगारी हेतू, दंगल माजवणं अशा गुन्ह्यांची कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहे. दोन्ही आमदार आरोपपत्रांची प्रत घेण्यासाठी कोर्टात हजर होते. 19 मार्च रोजी एपीआय सूर्यवंशीना या आमदारांनी विधानभवनात मारहाण केली होती. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांच्यासह 15 जणांविरोधात FIR दाखल केला होता. या प्रकरणी दोघाही आमदारांनी तीन दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2013 07:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close