S M L

भाजपशी युती तोडण्याचा रामदास कदम यांचा इशारा

17 जानेवारी, बेळगावबेळगावातील मराठी भाषिकांची दडपशाही अशीच सुरू राहिली तर भाजपशी युती तोडू असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला आहे. ते बेळगावात बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकानं परवानगी नाकारली होती. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीविरुद्ध लढणार्‍या एकीकरण समितीचे नेते एन. डी. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याविरोधात आज बेळगावात काळा दिन पाळला जात आहे. त्यानिमित्ताने बोलताना कदम यांनी हा इशारा दिला.यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारचा कडाडून निषेध केला आणि एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. "भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क कर्नाटक सरकार नाकारत आहे. महाराष्ट्रात भाजप आमच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आह, महाराष्ट्रातले भाजप नेते सीमाप्रश्नी मराठी माणसाला पाठिंबा देतात, मात्र इथे खंजीर खुपसतात. भाजप जरी आमचा मित्रपक्ष असला तरी जर या प्रश्नी ते जर दुटप्पी भूमिका घेणार असतील, तर त्यांच्याशी युती तोडण्याशिवाय आम्ही रहाणार नाही" असं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारच्या दंडुकेशाहीचा कडक शब्दात निषेध केला. "बेळगावातल्या नागरिकांची महाराष्ट्रात येण्याची मागणी आहे. दडपशाहीनं ती दाबता येणार नाही. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. हा हक्क जर नाकारला जाणार असेल, तर ती लोकशाहीची पायामल्ली आहे. शेकडो मराठी तरुणांचं आयुष्य कर्नाटक सरकारनं उध्वस्त केलंय. पण आता हे खपवून घेतलं जाणार नाही. या दडपशाहीचं उत्तर आम्ही दिल्याशिवाय रहाणार नाही" असं रामदास कदम म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2009 12:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2009 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close