S M L

एसटीचा प्रवास 1.24 पैशांनी महागला

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2013 09:54 PM IST

एसटीचा प्रवास 1.24 पैशांनी महागला

29 जून : सर्वसामान्यांची एसटी प्रवास आता महागणार आहे. आता साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या 24 किलोमीटरच्या प्रवासासाठी 1 रुपये 25 पैसे तर 25 ते 30 किलोमीटरच्या प्रवासासाठी 2 रुपये अशी वाढ करण्यात आलीय.

 

गेल्या काही महिन्यांत झालेल्या डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाला भाडेवाढीची परवानगी दिली आहे. येत्या 2 जुलैपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. पण राज्याच्या ग्रामीण भागाशी एसटी जोडली असल्यानं भाडेवाढ कमीत कमी ठेवली असल्याचं महामंडळानं म्हटलंय. या अगोदर मागिल वर्षी 12 डिसेंबर रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर डिझेल दरवाढी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2013 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close