S M L

नांदेडमध्ये हत्तीरोगाची साथ,302 रूग्णांना संसर्ग

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2013 05:51 PM IST

नांदेडमध्ये हत्तीरोगाची साथ,302 रूग्णांना संसर्ग

नांदेड 01 जुलै : भोकरदन तालुक्यात हत्तीरोगाच्या साथीने थैमान घातलंय. 116 गावांमध्ये 302 रूग्णांना या हत्तीरोगाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळतेय. तर चार रूग्णांना मात्र हत्तीरोग झाल्याचं स्पष्ट झालंय. हत्तीरोग नियंत्रणासाठी भोकर आणि किनी या दोन ठिकाणी हत्तीरोग नियंत्रण उपपथक कार्यालय आहे.

 

या दोन्ही पथकांकडून हत्तीरोग नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु असल्याचं सांगितलं जातंय. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांचे प्रयत्न अपुरे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दुसरीकडे परभणी जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरवातीलाच गॅस्ट्रोची लागण मोठ्या प्रमाणावर झालीय. गेल्या चार दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयात तब्बल 90 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इतर ठिकाणी पाऊस चांगला असला तरी जिल्ह्यात मात्र पावसाने दांडी मारलीय. त्यामुळे नागरिकांना मिळेल ते पाणी प्यावं लागतंय. या रुग्णांची योग्य सोय होत नसल्याचा आरोप त्यांचे नातलग करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2013 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close