S M L

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली अमरसिंग आणि संजय दत्त यांची भेट

17 जानेवारी, मुंबईगोविंद तुपेसंजय दत्तनं लखनौमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमरसिंह यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा यांनी रात्री संजयची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मायावती यांच्या विरोधात रणनिती ठरवण्यासाठी ही भेट झाली, की लखनौच्या उमेदवारीवरून, हे गुलदस्त्यातच आहे. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, या उक्तीप्रमाणं शत्रुघ्न सिन्हा आणि अमर सिंग एकत्र आले. ते मायावतीच्या हत्तीला रोखण्यासाठी का मुन्नाभाईला एम पी बनवण्यासाठी हे लवकरच स्पष्ट होईल. मुन्नाभाईला एम पी बनवण्याचा अमर सिंग यांनी जणू चंगच बांधलाय. ड संध्याकाळ पर्यतच्या या घडामोडीनंतर रात्री उशीरा भाजपा नेेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अमर सिंग यांची भेट घेतली. "शत्रुघ्न सिन्हा हे माझे चांगले मित्र आहेत. पण आच्यात काय चर्चा झाली, हे मात्र मी सांगू शकत नाही. ये राज की बात है..." असं अमर सिंग यांनी सांगितलं. लखनौ मधून संजयच्या उमेदवारीमुळे भाजपला होणार्‍या नुकसानीच्या संदर्भात अमर सिंग आणि शत्रुग्न सिन्हा यांची भेट झाली असल्याचीही शक्यता आहे. या भेटीबद्दल शत्रुघ्न सिन्हांना विचारलं असता अमरसिंह आपले चांगले मित्र असल्याचं त्यांनी सांगितलं. "अमर सिंग हे चांगले नेते आहेत. त्यांनी संजय दत्तला उमेदवारी देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याची प्रशंसा करण्यासाठी मी अमर सिंग यांची भेट घेतली" असं शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं.संजय दत्तच्या उमेदवारी संदर्भात रोज नव्या घडामोडी घडताहेत. शत्रुग्न सिन्हा यांनी या प्रकरणात उडी घेतल्यानं आता कहानीत ट्वीस्ट नक्कीच आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2009 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2009 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close